पायाला गॅंगरीन, थंडी-तापाने फणफणणारा रुग्ण रस्त्यावर, एका ट्विटवर 20 मिनिटात आदित्य ठाकरेंकडून रुग्णाला मदत

| Updated on: Jun 14, 2020 | 9:12 AM

आदित्य ठाकरे यांनी रुग्णाला तत्परतेने अवघ्या 20 मिनिटात मदत केल्याने या रुग्णाचा जीव वाचला आहे (Aaditya Thackeray help poor patient in Mumbai).

पायाला गॅंगरीन, थंडी-तापाने फणफणणारा रुग्ण रस्त्यावर, एका ट्विटवर 20 मिनिटात आदित्य ठाकरेंकडून रुग्णाला मदत
Follow us on

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ज्यांना आपला पक्का निवारा होता अशा लोकांची गैरसोय होऊन हाल झालेच. मात्र, त्यापेक्षा अधिक पटीने फूटपाथवर आसरा घेणाऱ्यांच्या हालअपेष्टा झाल्याचं पाहायला मिळालं. आताही मुंबईत असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. अंधेरीतील आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ दीड महिन्यापासून पायाला गँगरीन आणि थंडी-ताप अशा अवस्थेत एक रुग्ण पडून होता. या रुग्णांची माहिती एका सजग मुंबईकराने ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्परतेने 20 मिनिटातच केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे या रुग्णाचा जीव वाचला आहे (Aaditya Thackeray help poor patient in Mumbai).

जयदेव पांचाळ असं या रुग्णाचं नाव आहे. ते आजारी अवस्थेत आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या परिसरात रस्त्यावरच झोपून होते. तेथून जाणाऱ्या एका सजग मुंबईकराच्या ही गोष्ट लक्षात आली. यानंतर या संबंधित महिलेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करुन या रुग्णाची माहिती दिली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ या ट्विटची दखल घेत कोणताही विलंब न करता या रुग्णाला मदतीसाठी आपले विश्वासू सहकारी राहुल कनाल यांना सांगितले. अवघ्या 20 ते 25 मिनिटात राहुल कनाल आणि युवासेनेच्या टीमने रुग्णवाहिका घेऊन रुग्णला मदत केली.

रुग्णाची अवस्था प्रचंड गंभीर होती. या रुग्णाच्या उजव्या पायाला जखम होती आणि त्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्याचं गँगरीन तयार झालं होतं. त्यामुळे रुग्ण थंडी आणि तापाने फणफणत होता. हे लक्षात येताच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णाला तात्काळ उपचार करण्यासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या सहकार्याने त्यांना तातडीने उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी, युरिन आणि शुगर टेस्ट करण्यात आली. यानंतर लगेचच रुग्णावर ओपेशन करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. याची तयारी जेमतेम 30 मिनिटात करुन शस्त्रक्रिया झाली. या रुग्णाला उपचारासाठी आणखी उशीर झाला असता तर त्याच्या जीवालाही धोका होता, अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा :

पुण्यात 2 महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालकाचा मृत्यू दडपण्याचा प्रयत्न, तब्बल 7 दिवसांनी पालिकेकडे मृत्यूची माहिती

मिशन बिगीन अगेननंतर महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, अवघ्या 6 दिवसात तब्बल 18 हजार 500 रुग्ण

Navi Mumbai Corona Update | नवी मुंबईत सर्वाधिक 191 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा  3 हजार 734 वर

Aaditya Thackeray help poor patient in Mumbai