चित्रा वाघ यांच्या पतीचं काय आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण?; वाचा सविस्तर रिपोर्ट

| Updated on: Feb 27, 2021 | 10:40 AM

किशोर वाघ यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले होते.| Kishor Wagh Chitra Wagh

चित्रा वाघ यांच्या पतीचं काय आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण?; वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow us on

मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते. त्यामुळे आता यावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ACB filed case against bjp leaders Chitra Wagh husband Kishor Wagh)

किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी रुग्णालयात कार्यरत होते. 2016 मध्ये चार लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये किशोर वाघ यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे किशोर वाघ दोषी असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर किशोर वाघ यांच्यावर निलंबन वगळता इतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे प्रकरण?

किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात त्यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते.
या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक , वारसाहक्काची मालमत्ता, खर्च या गोष्टींची तपासणी करण्यात आली होती.

या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची अपसंपदा आढळून आली होती. किशोर वाघ यांच्याकडे असणारी एकूण अपसंपदा एकूण उत्पन्नाच्या सुमारे 90 टक्के इतके होती. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरून किशोर वाघ यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) आणि 13(1) ई या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामुळे 2019 मध्ये चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार

(ACB filed case against bjp leaders Chitra Wagh husband Kishor Wagh)