Aaditya Thackeray: कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचूच दिलं जात नव्हतं; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाना

| Updated on: Jun 25, 2022 | 10:01 PM

महाविकास आघाडीतील अनेक लोकप्रतिनिधींची कोणतीही कामं असतील तर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांनी स्वतःला विकले असले तरी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी तरी यावं लागेल असा जोरदार टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना जोरदारपणे लगावला.

Aaditya Thackeray: कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचूच दिलं जात नव्हतं; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाना
Follow us on

मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result2022) राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला. बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय बैठकांनाही आता वेग आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळव्यात मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी मनोगत व्यक्त करताना बंडखोर आमदारांवर निशाना साधत सच्च्या शिवसैनिकांनी (Shivsena) दिलेल्या या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानत पक्षातील फुटीर आमदारांवर त्यांनी निशाना साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जा असंही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे.

अंतर्गत कलह वाढला

आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील अंतर्गत कलह कसा वाढला आणि त्याचा फटका सामान्य शिवसैनिकांना कसा बसला याविषयी त्यांनी आपले मत मांडल. यावेळी त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचूच दिलं जात नव्हतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षातील घाण गेली

ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली असं मत त्यांनी व्यक्त करत गेली ती घाण गेली असा घणाघातही त्यांनी बंडखोर आमदारांवर त्यांनी केले. ज्या बंडखोर आमदारांनी कारणं सांगत बंडखोरी केली आहे, त्यांची किती तरी कामं आपण केली आहेत, आणि जो जनतेचा निधी आहे, तो जनतेला तात्काळ दिला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावं तर लागेलच