AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवार आणि मोदींच्या बैठकीत काय ठरलं?’, गौप्यस्फोटानंतर वर्मावर बोट?

पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांनी गौप्यस्फोट केला.आता पहाटेच्या शपथविधीआधीच्या एक एका घटनेकडे बोट दाखवलं जातंय.

'पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवार आणि मोदींच्या बैठकीत काय ठरलं?', गौप्यस्फोटानंतर वर्मावर बोट?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 16, 2023 | 12:25 AM
Share

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांनी गौप्यस्फोट केला.आता पहाटेच्या शपथविधीआधीच्या एक एका घटनेकडे बोट दाखवलं जातंय. मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी मोदी आणि पवारांच्या भेटीत काय ठरलं होतं ? असा सवाल केलाय.

प्रकाश महाजन म्हणाले देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात असा काही धमका झाला वेगवेगळे अँगल आता समोर येत आहेत. शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतरच, अजित पवारांसोबत शपथविधी झाला, असं फडणवीस म्हणालेत.

अर्थात खुद्द शरद पवारांनीच फडणवीसांचा दावा फेटाळला पण मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी पहाटेच्या शपथविधी आधी मोदी पहाटेचा शपथविधी 23 नोव्हेंबर 2019ला झाला. पहाटेच्या शपथविधीआधी 20 नोव्हेंबर 2019ला शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आणि सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या जवळपास 40 मिनिटं मोदी आणि पवारांमध्ये बैठक झाली. एकीकडे महाविकास आघाडीच्या निर्मितीची बैठक होत होती..तर मग मोदी आणि पवारांमध्ये बैठक कशी काय ? यावर उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या होत्या. त्यामुळंच फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटात दम आहे, असं प्रकाश महाजन म्हणालेत.

काश महाजनांचा थेट सवाल आहे की, पवार आणि मोदींचं काय ठरलं होतं. दिल्लीतल्या मोदींसोबतच्या बैठकीनंतर 3 दिवसांतच अजित पवारांनी फडणवीसांसोबत हातमिळवणी केली आणि पहाटेचा शपथविधी करत महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणला होता. त्यावेळी अजित पवारांचं म्हणणं होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचं सरकार चालणार नाही.

आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर, पुन्हा शरद पवारांची मोदींसोबतची बैठक चर्चेत आली. विशेष म्हणजे त्यावेळी पवारांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोदींना भेटल्याचं म्हटलं होतं. पण महिन्याभरानंच म्हणजे 2 डिसेंबरला, या बैठकीतलं सत्य स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं. मोदींनी पवारांना सोबत काम करण्यासंदर्भात ऑफर दिली होती, असा खुलासाही पवारांनीच केला होता. सुप्रिया सुळेंना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्यासंदर्भातही शब्द दिला होता पण आपणच ऑफर नाकारल्याचं पवार त्यावेळी म्हणाले होते..

ज्या 1978च्या घटनेचा, प्रकाश महाजन उल्लेख करत आहेत ते प्रकरण वसंतदादा पाटलांचं आहे. त्यावेळी सत्ताधारी पक्षातच असलेल्या पवारांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन वसंतदादांचं सरकार पाडलं होतं. तर आता राजकीय स्टेटमेंट करुन फडणवीसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. चंद्रशेखर बावनकुळे11.59AM PUNE AVI BAWANKULE

TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनी अटकेचा डाव होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं खोटी कागदपत्रं तयार केली होती, असाही दावा केला. फडणवीसांचा हाही दावा फेटाळताना राऊतांनी फडणवीसांना डिवचलंय. मार्च 2021 मध्ये मविआच्या काळात गृहविभागात बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता तशी तक्रार त्यांनी केंद्रीय गृहविभागाकडेही केली होती.

दरम्यान गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणात फडणवीसांचीच त्यांच्या सागर बंगल्यावर जावून 2 तास पोलिसांनी चौकशी केली होती. त्याचाच उल्लेख आता संजय राऊत करतायत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच