एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन, मुंबईसह अन्य विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीचा सर्व्हर डाऊन झाल्याने मुंबई, दिल्लीसह अन्य विमानतळावर एअर इंडियाची विमानसेवा ठप्प झाली आहे. आज पहाटे 3.30 वाजल्यापासून एअर इंडिया विमान कंपनीचा ‘SITA’ सर्व्हर बंद पडल्याने बोर्डिंग पास बनवण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या अन्य विमानतळांवर प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. Air India flights […]

एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन, मुंबईसह अन्य विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा
Follow us on

मुंबई : एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीचा सर्व्हर डाऊन झाल्याने मुंबई, दिल्लीसह अन्य विमानतळावर एअर इंडियाची विमानसेवा ठप्प झाली आहे. आज पहाटे 3.30 वाजल्यापासून एअर इंडिया विमान कंपनीचा ‘SITA’ सर्व्हर बंद पडल्याने बोर्डिंग पास बनवण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या अन्य विमानतळांवर प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

SITA सर्व्हर हा एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या आयटी आणि कम्युनिकेशन विभागाचे अत्याधुनिक सर्व्हर आहे. शनिवारी पहाटे 3.30 वाजल्यापासून हा सर्व्हर अचानक डाऊन झाले. या कारणाने विविध विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बोर्डिंग पास आणि इतर तांत्रिक गोष्टी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईसह दिल्ली विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा सर्व्हर किती वेळात पूर्ववत होईल याबाबतची कोणतीही माहिती प्रवाशांना एअर इंडियामार्फत देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर एअर इंडियाच्या प्रवक्ते ट्विट  करत म्हणाले, “SITA सर्व्हर डाऊन झाल्याने विमान उड्डाणे रखडली असल्याचे सांगितले. सध्या यावर आमचे तंत्रज्ञ काम करत आहेत. लवकरच हा सर्व्हर सुरळीत होईल.”

दरम्यान, एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी SITA सर्व्हर दुरुस्त झाल्याची माहिती देत ट्विट केले आहे. ते म्हणाले, “एअर इंडियाचा SITA सर्व्हर पूर्ववत करण्यात आला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत.”