अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर नको; रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा, पण अनिल पाटील यांचं मोठं आवाहन काय

Anil Patil on Rohit Pawar: काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजितदादांचा अपघात नसून घातपात झाल्याचा दावा केला. त्यावर आता अजितदादांच्या गोटातूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.

अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर नको; रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा, पण अनिल पाटील यांचं मोठं आवाहन काय
अनिल पाटील, रोहित पवार
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 11, 2026 | 12:48 PM

Anil Patil on Rohit Pawar: अजितदादांच्या अकाली एक्झिटने उभा महाराष्ट्र हळहळला. तर अजितदादांच्या विमान अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. हा अपघात होता की घातपात आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांना या अपघातात काहीतरी काळंबेरं झाल्याचा संशयच नाही तर आरोपही आहे. काल शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालं आहे. आता रोहित पवारांच्या या दाव्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चौकशीला पाठिंबा पण राजकारण नको

रोहित पवार यांच्या चौकशीच्या मागणीला आमचं समर्थन आहे. रोहित पवार हे अभ्यास मात्र त्यांनी ह्या प्रकरणात राजकीय झालर देऊ नये. अजित पवार ज्याला भेटायचं होते त्याला भेटत होते. कशाने प्रवास करायाचा हा दादांचा निर्णय होता. त्यांनी प्रकरणाचा दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची चौकशी बाजूला राहील, याप्रकरणाला राजकीय झालर दिली जाईल. चौकशी वेगळ्या मार्गाने जाता कामा नये असे अनिल पाटील म्हणाले. रोहित पवार यांनी केलेल्या मुद्यांना राष्ट्रवादीचं समर्थन आहे. सर्वांची भूमिका आहे. सखोल चौकशी व्हावी. दोषी असणार्‍या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, मात्र त्यांनी राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले.

सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष

रोहित पवार यांना किती माहिती आहे. रोहित पवार यांनी काय बोलाव त्यांचा अधिकार आहे. चर्चा घडायला हव्या होत्या काही घडल्या नाही. त्यामुळे ते आरोप करताय असे पाटील म्हणाले. तर शपथ विधी घाई घाईत करण्यात आला हे रोहित पवारांचं वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जबदारी स्वीकारली आहे, दादांनी पाठबळ दिले त्या लोकांना मार्गक्रमण देण्याचं स्वीकारले आहे. काही दिवसांनी आम्ही याप्रकरणी खुलासा देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. तर सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील असा दावाही आमदार अनिल पाटील यांनी केला.