Amazon vs MNS: मनसेचं खळखट्याक सुरुच; पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या वेअर हाऊसची तोडफोड

| Updated on: Dec 25, 2020 | 6:49 PM

यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांंनी औरंगाबाद आणि पुण्याच्या कोंढवा येथील अमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. | Amazon vs MNS

Amazon vs MNS: मनसेचं खळखट्याक सुरुच; पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या वेअर हाऊसची तोडफोड
Follow us on

मुंबई: अ‍ॅमेझॉन कंपनीने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना न्यायालयात खेचल्यानंतर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) अ‍ॅमेझॉनच्या (Amazon)आणखी एका गोदामाची तोडफोड केली आहे. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या या अ‍ॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांकडून लक्ष्य करण्यात आले. अमेझॉनने वकीलाच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे मनसैनिकांनी नाराज होऊन आज मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार येथील मारवे रोडवर असलेल्या अमेझॉनच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. हे सर्व मनसैनिक चांदीवली मतदार संघातील आहेत.
(MNS vandalised Amazon warehouse in Mumbai)

यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांंनी औरंगाबाद आणि पुण्याच्या कोंढवा येथील अमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे आता हे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे Amazon vs MNS हा वाद आणखीनच चिघळला आहे.

अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्या मालाची डिलिव्हरी होऊन देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.

मुंबईत अ‌ॅमेझॉनविरोधात फलक

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले होते. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळाले होते.

राज ठाकरेंना नोटीस

मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. “अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागेल, असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या:

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

Amazon vs MNS | राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Amazon vs MNS | ॲमेझॉनला किंमत मोजावी लागेल, राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक

(MNS vandalised Amazon warehouse in Mumbai)