मोठी बातमी! मुंबईत झाड कोसळून आणखी एकाचा बळी, आरे कॉलनीतील घटना
मुंबईमध्ये झाड कोसळून आता आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरे कॉलनीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाड कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

मुंबईत पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना वाढताना दिसत आहेत. मुंबईत झाड कोसळून आता आणखी एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. आरे कॉलनीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाड कोसळल्यामुळे झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत चेंबूर भागात स्कुल बसवर एक मोठं झाड कोसळल्याची घटना घडली होती, या अपघातामध्ये 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते, तर या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरी घटना कुर्ला येथील नौपाडा येथे घडली, झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला. तर त्यानंतर आता आरे कॉलनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. हसन रजा जहांगीर आलम सय्यद असं या तरुणाचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. याच काळात अचानक आरे कॉलनीमधील एक झाड कोसळलं, या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही शनिवारी दुपारची घटना आहे. पावसामुळे अचानक आरे कॉलनी परिसरात एक झाड कोसळलं, या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता, त्याला रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केलं. दरम्यान या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. याचदरम्यान मुंबईतील बांद्रा, कुर्ला, अंधेरी परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोरेगावमध्ये झाड कोसळून दोन महिला गंभीर जखमी
गोरेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, गोरेगावच्या एम. जी. रोडवर देखील एक मोठं झडा कोसळलं आहे. या झाडाखाली सापडून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. महापालिकेच्या मदतीने सुमारे १५ मिनिटांत झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आला आहे. योग्य छाटणी न झाल्याने झाड कोसळल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.