Vivek Phansalkar: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर, संजय पांडेंचा कार्यकाळ संपला, नव्या सरकारमध्ये नवे पोलीस आयुक्त?

विवेक फणसाळकर हे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. फणसाळकर यांच्याकडे सध्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार आहे. जुलै 2018 मध्ये फणसाळकर यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. संजय पांडें यांचा कार्यभार संपल्याने फणसाळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Vivek Phansalkar: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर, संजय पांडेंचा कार्यकाळ संपला, नव्या सरकारमध्ये नवे पोलीस आयुक्त?
| Edited By: | Updated on: Jun 29, 2022 | 9:21 PM

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी(Mumbai Police Commissioner) विवेक फणसळकर(Vivek Phansalkar) यांची नियुक्ती झाली आहे. संजय पांडेंचा(Sanjay Pandey) कार्यकाळ संपला असल्याने विवेक फणसळकर यांच्यावर पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तातडीने ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. नव्या सरकारमध्ये नवे पोलीस आयुक्तांची नियुक्ती अशी चर्चा रंगली आहे.

30  जून रोजी संजय पांडे सेवानिवृत्त होणार

30  जून रोजी विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे सेवानिवृत्त होत आहेत. यापूर्वी एमव्हीए सरकारच्या जवळचे संजय पांडे यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे बोलले जात होते. तत्पूर्वी राज्याच्या गृह मंत्रालयाने अधिकृत प्रेस रिलीज जारी केले आहे. विवेक फणसळकर यांच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे हे पत्र आहे.

कोण आहेत विवेक फणसाळकर?

विवेक फणसाळकर हे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. फणसाळकर यांच्याकडे सध्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार आहे. जुलै 2018 मध्ये फणसाळकर यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. संजय पांडें यांचा कार्यभार संपल्याने फणसाळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी

विवेक फणसळकर यांची ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.