Arvind Sawant : मुंबई केंद्रशासित करण्याची हिंमत करून दाखवा, मग बघाच, अरविंद सावंत यांचा इशारा

| Updated on: Apr 10, 2022 | 7:04 PM

शनिवारी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूरच्या जनतेला संबोधित करताना भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर काही वेळातच खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रहार केला आहे.

Arvind Sawant : मुंबई केंद्रशासित करण्याची हिंमत करून दाखवा, मग बघाच, अरविंद सावंत यांचा इशारा
हिंदुत्वावरून अरविंद सावंत यांचा भाजवर हल्लाबोल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutv) मुद्यावरून जोरदार खडजंगी सुरू आहेत. त्यातच कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूरच्या जनतेला संबोधित करताना भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर काही वेळातच खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रहार केला आहे. आजच्या राम नवमीबद्दल बोलताना, आज रामनवमी आहे, जय श्रीराम, राम राज्य करा, पण लक्ष्मणाबरोबर लढू नका. रावणाबरोबर लढाई जरूर करा, असे त्यांनी भाजपलाही सुनावले आहे. तसेच भाजप नेत्यांच्या इफ्तारच्या टोप्या आम्ही पाहिल्या आहेत. आता भाजप नेत्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. उद्धवजी यांनी म्हटलं होतं मंदिर वही बनायेंगे पण तारीख नही बतायेंगे. उद्धव ठाकरेंनी युतीत राहून भाजपला सुनावले आहे. ज्यांचे हिंदूत्व बेगडी आहे त्यांना सांगावं लागतं, 52 कॅरेट वाल्यांना सांगावं लागत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. आम्ही हिंदू ह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आम्ही ढोंग करत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

हनुमान चालीसावरूनही विरोधकांना टोला

मनसेला हनुमान चालीसा वाचून दाखवा असे शिवसेनेने कधीच आव्हान केलं नव्हतं, जाणीवपूर्वक हा डिवचण्याचा प्रकार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज हनुमान चालीसा वाचून दाखवली म्हणतात, मात्र पाठ केलेलं म्हणून आम्हाला आठवतं पण ज्यांना माहीतच नाही त्यांना वाचून दाखवायला लागतं, असा टोलाही त्यांनी मनसेला लगावाला आहे. तसेच ज्ंयानी म्हटलं त्यांच्या समोर जाऊन वाचून दाखवायचं, शिवसेना भवनासमोर वाचून काही फायदा नाही. ज्यांच्या पायाखालची वीट सरकली आहे, जे विटेवर उभा नाहीत आणि ज्यांच्यासाठी ढोग केलं त्यासाठी दाखवावं लागतं, असे म्हणत मनसे हे भाजपसाठी ढोंग करत अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव

मुंबईला केंद्रशासित करण्याच्या संदर्भात हालचाली करणारा सर्वे सुरू आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे. माझी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांची कन्या म्हणते मुंबईला केंद्रशासित करा आणि महाराष्ट्राची राजधानी पुणे करा. ती राहते कुठे तर कर्नाटकात, मग तुमचं बंगळुरू करा ना काय करायच ते, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. तसेच किरीट सोमय्या यात असू शकतात. ते सध्या गायब आहेत. किटकिट सोमय्या सो गया, असे म्हणत त्यांनी सोमय्यांचीही खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये जातात आणि महाराष्ट्रातील लोक गप्प बसतात तिथे समजत सगळं, त्यांच्या पोटात आणि ओठात काय येते तेव्हाच कळतं, असेही सावंत म्हणला आहेत.

आम्ही जिवंत आहोत, सेनेचा इशारा

आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यानंतर त्यांनी पहिलं सीमावासीयांच्या बद्दलची भूमिका मांडली आहे. मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की मुंबई महाराष्ट्राला मिळालेले नाही, ती लढून मिळवली. संघर्ष करून 106 हुतात्म्यांनी प्राण देऊन मिळवली आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी उथळ पाण्याला खळखळाट करू नये, असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे. तसेच मुंबईतला मराठी माणसाचा टक्का वगैरे दाखवू नका, मुंबई तोडली जाऊ शकत नाही, कुणच्या पिढ्या आल्या तरी तोडली जाऊ शकत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच कश्मीर फाईल चित्रपटातून हिंदू-मुस्लिम केलं. आता मराठी विरुद्ध गुजराती, कन्नड विरुद्ध मराठी करत आहेत. मतांच्या ध्रुवीकरणसाठी हे सगळं चाललंय, असे म्हणत त्यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तसेच मुंबईला केंद्रशासित करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलावलं, आम्ही जिवंत आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे

ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल