जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात? खरं कारण समोर

आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच आज त्याची जेलमधून सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण काही कारणास्तव आर्यनची आज जेलमधून सुटका होऊ शकली नाही.

जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात? खरं कारण समोर
अभिनेत्री जुही चावला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरुवारी (28 ऑक्टोबर) हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. हायकोर्टाकडून आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच आज त्याची जेलमधून सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण काही कारणास्तव आर्यनची आज जेलमधून सुटका होऊ शकली नाही. आर्यनची जेलमधून सुटका न होण्यामागील नेमकं कारण काय ते आता समोर आलं आहे.

जामीनाच्या प्रक्रियेला नेमका उशिर का झाला?

आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून सेशन कोर्टात आज संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला.

नियमानुसार जामीनासाठी जामीनदाराचे दोन फोटो जरुरीचे असतात. पण दोन फोटो नसल्याने या प्रक्रियेला उशिर झाला. यावेळी कोर्टाने वकिलांना फटकारले. जामीनाची सर्व प्रक्रिया माहिती असताना जामीनदारांना त्याबाबत आधी माहिती देणं अपेक्षित होतं, असं न्यायाधीशांनी वकिलांना सुनावलं. त्यानंतर जुहीचे आणखी एक पासपोर्ट साईज फोटो मागविण्यात आला.

…आणि आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला

दुसरीकडे आर्यनची जेलमधून सुटका व्हावी यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर असलेल्या जामीन पत्रपेटीत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामीनाचे सर्व कायदेशीर कागदपत्रे पोहोचणे अपेक्षित होतं. ही पेटी संध्याकाळी साडेपाचपर्यंत बंद होते. पण साडेपाच वाजेपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडू शकली नाही. या कायदेशीर प्रक्रियेला उशिर झाल्याने त्याचे कागदपत्रे जेलबाहेरील जामीन पत्रपेटीत पोहोचू शकले नाही. त्यामुळे आर्यनचा जेलमधील मुक्काम आणखी एका रात्रीने वाढला.

आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई

आर्यनच्या जेलमधून सुटका व्हावी यासाठी वेगवेगळ्या घडामोडी आपापल्या जागेवर घडत होत्या. आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला मन्नत लायटिंगने सजवण्यात आली. शाहरुख आर्यनला घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलच्या दिशेला रवाना होणार होता. शाहरुख येणार म्हणून त्याला आणि त्याच्या मुलाला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऑर्थर रोड जेलबाहेर मोठी गर्दी केलेली होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ऑर्थर रोड जेलबाहेर तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मन्नतबाहेरही शाहरुखच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली होती.

हेही वाचा :

आर्यनसाठी जुही चावला जामीनदार, शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री काय?; वाचा सविस्तर

आर्यनची आज सुटका नाहीच, जेल प्रशासनाकडून कायदेशीर कारण सांगत सुटकेस नकार


Published On - 7:52 pm, Fri, 29 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI