Asaduddin Owaisi on Raj Thackeray: राज ठाकरेंना तुरुंगात टाका, डोकं शांत होईल; ओवैसी भडकले

| Updated on: May 02, 2022 | 5:24 PM

Asaduddin Owaisi on Raj Thackeray: एक व्यक्ती औरंगाबादची एकतेला बाधा आणणार आहे का? त्यांचे भाषण म्हणजे हिंसेला प्रवृत्त करणारं आहे.

Asaduddin Owaisi on Raj Thackeray: राज ठाकरेंना तुरुंगात टाका, डोकं शांत होईल; ओवैसी भडकले
Asaduddin Owaisi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर 4 तारखेला मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठण करा, असं फर्मानच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सोडलं आहे. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या या विधानावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचं भाषण हिंसा भडकवणारं आहे. त्याची पोलीस गंभीर दखल का घेत नाही. महाराष्ट्र मोठा आहे की व्यक्ती मोठा आहे?, असा सवाल करतानाच नवनीत राणावर कारवाई होऊ शकते तर राज ठाकरेंवर कारवाई का होऊ शकत नाही? त्यांना तुरुंगात टाका. त्यांचं डोकं शांत होईल, असा हल्लाबोल ओवैसी यांनी केला आहे.

एक व्यक्ती औरंगाबादची एकतेला बाधा आणणार आहे का? त्यांचे भाषण म्हणजे हिंसेला प्रवृत्त करणारं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या भावाविरोधात कारवाई करायची नाहीये. महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? राष्ट्रवादी काय करत आहे? असा सवाल ओवैसी यांनी केला.

सर्व भाऊ सारखेच

तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्ही असं बोलत आहात. सर्व भाऊ एक सारखेच आहेत. राज ठाकरे महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का? हा आमचा सवाल आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार आंधळी सरकार आहे. या सरकारमुळे संपूर्ण मुस्लिम समुदाय त्रस्त आहे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भोंग्यांबाबत मौन का?

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. त्यांचंच राज्यात सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर कुणी तरी हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देतात आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला जातो. मात्र, मशिदीसमोर लाऊडस्पीकर वाजवण्याची घोषणा करणाऱ्यांबाबत मौन पाळलं जातं. तेव्हा तुम्ही गप्प का होता? असा सवालही त्यांनी केला.