AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका, वारकरी शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने आज रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका, अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.

पायी वारीची परंपरा खंडित होऊ देऊ नका, वारकरी शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
Governor Bhagat Singh Koshyari with Warkari
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 21, 2021 | 5:01 PM
Share

मुंबई : राज्य सरकारने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायी वारी करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने आज (21 जून) रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. (Ashadhi Wari 2021 : Don’t let the tradition of PaiWari be broken, demand of Warkari delegation to the Governor)

या शिष्टमंडळात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सदस्य ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ, संत तुकारामांचे वंशज आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे माजी अध्यक्ष ह. भ. प संजयनाना महाराज धोंडगे, प्रख्यात किर्तनकार आणि विश्व हिंदु परिषदेचे ह. भ. प.एकनाथ महाराज सदगीर आदी सहभागी होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तुषार भोसले म्हणाले की, “महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजामांच्या, मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही तिला सलग दुसऱ्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह 50 वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. आमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह 50 वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी कारण असेही हे सरकार उठसूठ केंद्राकडेच सर्व मागत आहे. धर्मरक्षक राज्यपाल वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पायी वारीची परंपरा जोपासण्यासाठी नक्की प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे.”

संबंधित बातम्या

प्रत्येकी 100 वारकरी, 1.5 किमी पायी वारी, आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर

आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

(Ashadhi Wari 2021 : Don’t let the tradition of PaiWari be broken, demand of Warkari delegation to the Governor)

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत