एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आशिष कुमार सिंग यांना हटवून गगराणींना मुख्य अपर सचिव म्हणून नेमलं

| Updated on: Jul 20, 2022 | 6:50 PM

अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना आता दुसरी जबाबदारी देण्यात येत आहे. दरम्यान, आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्दबातल करण्याचा धडाका एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लावल्याच्या चर्चाही आता सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आशिष कुमार सिंग यांना हटवून गगराणींना मुख्य अपर सचिव म्हणून नेमलं
एकनाथ शिंदे (संपादित छायाचित्र)
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का दिला आहे. मंत्रालयात विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच इतर ठिकाणी नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यातच आणखी एक नियुक्ती आणि एकाचा कार्यभार संपुष्टात आणण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. मुंबईतील मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना या पदावरून दूर केले आहे. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तो हटविण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी डॉ. बी. ए. गगराणी (B. M. Gagrani) यांना या पदावर नेमण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना आता दुसरी जबाबदारी देण्यात येत आहे. दरम्यान, आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्दबातल करण्याचा धडाका एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लावल्याच्या चर्चाही आता सुरू झाल्या आहेत.

अतिरिक्त कार्यभारही सांभाळावा लागणार

अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी यासंबंधी बी. ए. गगराणी यांना बदलीसंबंधी पत्र पाठवले आहे. आशिष कुमार सिंह यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे. यासोबतच अपर मुख्य सचिव (1), नगर विकास विभाग, मराठी भाषा विभाग आणि जलसंपदा विभाग या पदांचे अतिरिक्त कार्यभारही पुढील आदेश येईपर्यंत गगराणी यांच्याकडेच राहणार असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. नितीन गद्रे यांनी हे पत्र डॉ. बी. ए. गगराणी यांना पाठवले आहे.

हे सुद्धा वाचा

आधीचे निर्णय आणि नियुक्त्या रद्द करण्याचा धडाका

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आधीच्या सरकारचे निर्णय आणि नियुक्त्या बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा धडाका लावला आहे. सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना प्रथम आरे कारशेडचा निर्णय घेतला, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा आधीचा निर्णय रद्द करत नव्याने निर्णय घेतला. तर आता बदल्यांमध्येदेखील मर्जीचे अधिकारी ठेवण्यावर भर दिला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय रद्द केले जात आहेत. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकवेळा नाराजीही व्यक्त केली आहे.