AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा, आता भाजपची भूमिका काय? आशिष शेलार स्पष्टच म्हणाले…

नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. सना मलिक यांच्या उमेदवारीबाबतही शेलार यांनी आपले मत मांडले आहे. मलिक यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील राजकारणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा, आता भाजपची भूमिका काय? आशिष शेलार स्पष्टच म्हणाले...
नवाब मलिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा, आता भाजपची भूमिका काय?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 29, 2024 | 10:01 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याची माहिती आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली. “भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही”, असं नवाब मलिक स्पष्ट म्हणाले आहेत.

“भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही”, असंदेखील आशिष शेलार म्हणाले.

भाजप सना मलिकांना सपोर्ट करणार का?

नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही”, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

नवाब मलिक यांच्या उमेदवारीस भाजपचा आधीपासूनच विरोध आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यासच भाजपचा विरोध होता. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र पाठवत विरोध केला आहे. नवाब मलिक यांना पक्षात सहभागी करुन घेतल्यास महायुतीत आपली मैत्री तुटूव शकते, असे स्पष्ट संकेतदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यानंतर आता नवाब मलिक यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवारांना नवाब मलिकांच्या पक्षप्रवेशावर इशाऱ्या देणाऱ्या भाजपचा मलिकांना राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या उमेदवारीस मूक संमती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन