युटयूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपींना बेड्या

| Updated on: Oct 25, 2020 | 12:01 PM

युट्यूबवर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कसे फोडतात याचे व्हिडिओ पाहून भांडुपमध्ये राहणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याने एटीएम फोडण्याचा कट रचला होता.

युटयूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपींना बेड्या
Follow us on

मुंबई : युट्यूबवर प्रत्येक गोष्टीची ‘रेसिपी’ पाहायला मिळते. आपणही अनेक गोष्टींसाठी युट्यूबवरील व्हिडीओंची मदत घेतो. परंतु युट्यूबवरील व्हिडीओंचा वाईट कामांसाठीदेखील वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशीच एक घटना मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली आहे. (ATM Robbery YouTube video, mumbai news, crime news, marathi news)

युट्यूबवर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कसे फोडतात याचे व्हिडिओ पाहून भांडुपमध्ये राहणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याने एटीएम फोडण्याचा कट रचला. परंतु नागरिकांच्या जागरुकतेमुळे पोलिसांनी सतर्कता दाखवत 12 तासात या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दुर्गेश चौबे, शहजाद खान, अरमान अहमद, सलमान चौधरी यांच्यासोबत एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने हा कट रचला होता. यासाठी त्यांनी मुलुंडमधील इंडियन बँकेच्या एटीएमची रेकीसुद्धा केली होती. शुक्रवारी रात्री तीनच्या दरम्यान हे सर्वजण या एटीएमजवळ पोहोचले.

एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आपले चेहरे दिसू नये यासाठी त्याच्यावर स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु एटीएममध्ये धुर होऊ लागला. आजूबाजूचे नागरिक सतर्क होतील म्हणून या सर्वांनी काही वेळासाठी त्यांचे हे काम थांबवले आणि बाहेरील रस्त्यावर फिरु लागले.

हे तरुण रस्त्यावर फिरत असताना जागरूक नागरिकांनी त्यांना हटकलं. आपली चोरी पकडली जाईल म्हणून या सर्वांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यासंदर्भात येथील नागरिकांनी मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 12 तासांमध्ये या सर्वांना तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी जेरबंद केलं.

संबंधित बातम्या

“ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ” दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत

भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक

काकीने फसवून ड्रग्जचे पाकीट पाठवले, कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा झालेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस NCB च्या हाती

धक्कादायक! गाडी अडवली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांनी तलवारीने केले वार

(ATM Robbery YouTube video, mumbai news, crime news, marathi news)