AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकीने फसवून ड्रग्जचे पाकीट पाठवले, कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा झालेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस NCB च्या हाती

दोहा विमानतळावर सामानामध्ये 4.1 किलो चरस सापडल्यानंतर मुंबईतील जोडप्याला गेल्या वर्षी जुलैमध्ये दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती

काकीने फसवून ड्रग्जचे पाकीट पाठवले, कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा झालेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस NCB च्या हाती
| Updated on: Oct 24, 2020 | 10:58 AM
Share

मुंबई : चार किलो अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा सुनावलेल्या मुंबईकर दाम्पत्याची केस एनसीबीने हाती घेतली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे व्यवस्थापकीय संचालक राकेश अस्थाना यांनी एनसीबीच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोपी दाम्पत्याच्या केसचा आढावा घेतला. (Mumbai Couple Sentenced to life term in Qatar Jail NCB approaches authorities)

कतारमधील दोहा विमानतळावर सामानामध्ये 4.1 किलो चरस सापडल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील जोडप्याला गेल्या वर्षी जुलैमध्ये दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. गर्भवती असलेल्या आरोपी तरुणीने या काळात कारागृहातच बाळाला जन्म दिला.

मुंबईतच राहणाऱ्या पतीच्या काकीने जोडप्याला हनिमून टूर भेट दिली होती. कतारला जातच आहात, तर माझ्या नातेवाईकांना भेटवस्तू द्या, असे सांगून काकीने एक पाकीट दिल्याचा दावा जोडप्याने केला. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबाने एनसीबीकडे धाव घेत या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. एनसीबीने या प्रकरणात लक्ष घालून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. आता दूतावासाच्या माध्यमातून एनसीबीने हा प्रश्न कतार अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे

नेमकं प्रकरण काय?

मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्याची पत्नी ओनिबा या भारतीय प्रवाशांना 6 जुलै 2019 रोजी कतारमधील दोहा इथल्या हमद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज अंमलबजावणी पथकाने पकडले होते. दाम्पत्याच्या सामानातून 4.1 किलो चरस ताब्यात घेण्यात आले होते. शरीक आणि ओनिबा यांच्यावर कतारमध्ये खटला चालवण्यात आला. दोषी आढळल्याने दोघांना दहा वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी तीन लाख रियाल (अंदाजे 60 लाख रुपये) दंड सुनावण्यात आला.

ओनिबाचे वडील शकील कुरेशी यांनी 27 सप्टेंबर 2019 रोजी एनसीबीकडे तक्रार केली होती. ओनिबा आणि शरीक निर्दोष आहेत. शरीकची काकी तबस्सुम रियाझ कुरेशी आणि तिचा सहकारी निजाम कारा यांनी दोघांना फसवल्याचा आरोप त्यांनी केला. हनिमून पॅकेजच्या आमिषाने दोघांना कतारला पाठवले आणि त्यांना सीलबंद पाकीट नेण्याची गळ घातली, असा दावा कुटुंबाने केल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांनी दिली. (Mumbai Couple Sentenced to life term in Qatar Jail NCB approaches authorities)

शकील कुरेशी यांनी तक्रारीसह संबंधित कागदपत्रे, शरीक आणि काकी तबस्सुम यांच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग असलेली कॉम्पॅक्ट डिस्क एनसीबीला दिली. शकील कुरेशी यांनी केलेल्या आरोपांची एनसीबीतर्फे सविस्तर चौकशी करण्यात आली. तबस्सुम आणि इतरांचा सहभाग असलेले सुनियोजित ड्रग्ज तस्करी रॅकेट सुरु असल्याचे तपासात समोर आले.

संबंधित बातम्या :

एनसीबी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा दावा, क्षितीज प्रसादचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

(Mumbai Couple Sentenced to life term in Qatar Jail NCB approaches authorities)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.