AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या ट्रेनमध्ये दोन तरुणींमध्ये चांगलीच जुंफली असल्याचे दिसत आहे. महिला डब्यातील इतर प्रवाशांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
सांकेतिक फोटोImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 8:59 AM
Share

मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेन ओळखली जाते. अगदी कमी वेळात आणि कमी पैशांमध्ये लोकच्या माध्यमातून लांबचा प्रवास करता येतो. अनेकजण सकाळी ऑफिसला जाण्यासाठी किंवा ऑफिस सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. दरम्यान, सोशल मीडियावर याच लोकल ट्रेनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची तुफान हाणामारी दिसत आहे.

कोणत्या ट्रेनमध्ये घडला प्रकार?

मुंबई आणि आसपासच्या भागातील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेकदा विविध प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते. अलीकडेच एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यात दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही तरुणी एकमेकींचे केस ओढत जोरदार मारहाण करताना दिसत आहेत. धावत्या ट्रेनमध्ये अशा प्रकारची हाणामारी पाहून प्रवाशांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार ही घटना बदलापूरहून CSMT दिशेने जाणाऱ्या लोकलमधील महिलांच्या डब्यात घडली असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसते की दोन्ही तरुणी एकमेकींना घट्ट पकडून केस ओढत मारत आहेत. त्यांच्यातील वाद इतका तीव्र झाला होता की आसपासच्या महिला प्रवाशांनाही हस्तक्षेप करावा लागला. इतर महिला प्रवाशांनी दोन्ही तरुणींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि हाणामारी थांबवण्यासाठी मध्यस्थी केली. तरीही काही वेळ दोन्ही बाजूंनी जोरदार राडा सुरू होता.

रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू

लेडीज डब्यात नेमका वाद कशामुळे सुरू झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही जणांनी जागा न मिळणे किंवा वैयक्तिक कारणांमुळे वाद वाढला असावा असे अनुमान काढले आहे, मात्र अधिकृतपणे कारण अद्याप अस्पष्ट आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आणि संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी GRP (गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस) आणि रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी केली जात असून संबंधित तरुणींना ओळखून त्यांच्याकडून जबाब घेण्यात येईल, अशी शक्यता आहे.

Follow Us