AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरातील आंदोलनाने सात तास वाहतूक ठप्पच, प्रवाशांचे प्रचंड हाल, लांबपल्ल्याच्या गाड्या वळविल्या

मध्य रेल्वेचा कारभार गेले काही दिवस लेटलतीफ होताच. आता त्यात बदलापूर शाळेतील मुलीच्या लैंगिक शोषणाच्या संतापाची ठिणगी पडली आहे.मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ नसून अनेकदा या स्थानकावर आंदोलन झालेले आहे.

बदलापूरातील आंदोलनाने सात तास वाहतूक ठप्पच, प्रवाशांचे प्रचंड हाल, लांबपल्ल्याच्या गाड्या वळविल्या
Badlapur residents stop trains
| Updated on: Aug 20, 2024 | 2:58 PM
Share

बदलापूर येथील एका शाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना बदलापूर स्थानकात जोरदार रेल रोको केल्याने लोकल गाड्यांसह लांबपल्ल्याच्या गाड्यांचाही खोळंबा झाला आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरु झालेल्या या रेल रोकोवर अजूनही तोडगा न निघाल्याने मध्ये रेल्वे ठप्प झाली आहे. अंबरनाथ आणि कर्जत दरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने हातावर पोट असणार्‍या सामान्य गरीब लोकांचा व्यवसाय बुडाला आहे. या मार्गावरील लांबपल्ल्याच्या ट्रेनना आता कर्जत मार्गे व्हाया पनवेल ते सीएसएमटी वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत सकाळी पोहचणाऱ्या इंटरसिटी गाड्यांतील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

बदलापूरातील एका प्रतिष्ठीत शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन मुली लघुशंकेसाठी जाताना हा घृणास्पद प्रकार शाळेतील एका कर्मचाऱ्याने केला आहे. त्यामुळे शाळेवरील विश्वासाला तडा गेला आहे. या शाळेतील व्यवस्थापनाविरोधा बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला होता.त्यानंतर शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. आज मंगळवारी बदलापूर स्थानकात आंदोलकांनी शिरकाव ‘रेल रोको’ केला. या प्रकरणाला मध्य रेल्वेच्या ‘डीआरएम’ यांनी बाह्य कारणांनी मध्य रेल्वे अंबरनाथ आणि कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर धावू शकत नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. बदलापूर स्थानकात रेल्वे रोको सुरुच मध्य रेल्वेने लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत- पनवेल मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणात आंदोलकांची  गर्दी पांगविण्यासाठी आणि स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार विनंती करून आंदोलक माघार  घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता  संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर पोलिसांनी काढता पाय घेतला आहे. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

रेल्वेची पोस्ट येथे पाहा –

या मेल – एक्सप्रेस कर्जत- पनवेल मार्गे वळविल्या

1) 22159 CSMT – MAS Express JCO 20.08.2024

2) 12263 Pune – NZM DURANTO EXP JCO 20.08.2024

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.