Video Udaipur murder case : कन्हैयालालच्या मारेकऱ्यांची धुलाई, न्यायालय परिसरातच वकील, नागरिकांनी झोडपले

हत्येचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक सुधीर यांनी यांनी नाकाबंदी दरम्यान आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी हेल्मेट घालून पळून जाण्याच्या बेतात होते. एका व्हिडीओत शिरच्छेद करत असल्याचं आरोपी सांगत असल्याचं ऐकू येते. नुपूर शर्माचा उल्लेखही करण्यात आला.

Video Udaipur murder case : कन्हैयालालच्या मारेकऱ्यांची धुलाई, न्यायालय परिसरातच वकील, नागरिकांनी झोडपले
कन्हैयालालच्या मारेकऱ्यांची धुलाई
Image Credit source: ANI
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 02, 2022 | 9:54 PM

मुंबई : कन्हैयालाल हा उदयपूरचा टेलर. या कन्हैयालालची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाच्या परिसरात आणण्यात आलं होतं. यावेळी वकील आणि नागरिकांनी (Citizen) या आरोपींना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. चारही आरोपींना न्यायालय परिसरात आणण्यात आलं होतं. त्यावेळी आरोपींना मारहाण (Assault) करण्यात आली. या चारही आरोपींना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी (Court Cell) सुनावण्यात आली आहे. नुपूर शर्मा यांचे समर्थन कन्हैयालाल यांनी केलं होतं. त्यानंतर ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. कन्हैयालाल या टेलरच्या हत्येमागे दहशतवादी गट कार्यरत आहे काय, याचा तपास सुरू आहे.

पाहा व्हिडीओ

सात पोलीस ठाणे परिसरात संचारबंदी

उदयपूरच्या धनमंडी ठाण्याअंतर्गत दोन हल्लेखोरांनी दुकानात घुसून कन्हैयालालही गळा चिरून हत्या केली. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. वातावरण तापू नये म्हणून सात पोलीस ठाण्याअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

राजसमंद जिल्ह्यात आरोपींना अटक

हत्येचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक सुधीर यांनी यांनी नाकाबंदी दरम्यान आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी हेल्मेट घालून पळून जाण्याच्या बेतात होते. एका व्हिडीओत शिरच्छेद करत असल्याचं आरोपी सांगत असल्याचं ऐकू येते. नुपूर शर्माचा उल्लेखही करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

अशी केली कन्हैयालालची हत्या

दोन्ही आरोपी कन्हैयालालच्या दुकानात गेले. रियाज नाव असल्याचं सांगितलं. कपडे शिवण्यासाठी आणल्याचं त्यानं सांगितलं. कन्हैयालालनं माप घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीनं त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दुसऱ्या आरोपीनं मोबाईलनं घटनेचा व्हिडीओ बनवला. यात थरारक घटना कैद करण्यात आली. कन्हैयालालचा जागीच मृत्यू झाला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें