भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये बेस्टचे वीज बिल भरता येणार

या नव्या अतिरिक्त वीज बिल भरणा केंद्रांची अधिक माहिती बेस्टच्या www.bestundertaking.com या बेवसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये बेस्टचे वीज बिल भरता येणार
best electriciy
Image Credit source: best
| Edited By: | Updated on: Nov 28, 2022 | 7:45 PM

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई :  बेस्ट उपक्रमाच्या मुंबईतील दहा लाख ग्राहकांसाठी बेस्ट प्रशासनाने नवीन सुविधा निर्माण केली आहे. आता बेस्टच्या वीज ग्राहकांना  भारतीय स्टेट बँकेच्या शहरातील विविध शाखांमध्ये आपली वीज बिले भरता येणार आहेत.

भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई विभागातील 52 शाखांमधून रोख धनादेश, RTGS/NEFT, Direct Credit द्वारे येत्या एक डिसेंबरपासून बिल भरता येईल असे बेस्ट प्नशासनाने म्हटले आहे.

बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी ठाणे जनता सहकारी बँक 55 शाखा, कोटक महिंद्र बँक 34 शाखा, येस बँक 15 शाखा, इंडस बँक तीन शाखा, एचडीएफसी आणि वैश्य बँकेच्या प्रत्येकी एक आणि BBPS पुरस्कृत 42 बँका तसेच सात पोस्ट ऑफीसातील वीज भरणा केंद्रे अशा एकूण 210 वीज बिल केंद्राची सुविधा निर्माण झाल्याचे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

या नव्या अतिरिक्त वीज बिल भरणा केंद्रांची अधिक माहिती बेस्टच्या www.bestundertaking.com या बेवसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.