बेस्टतर्फे आता ”टॅप इन टॅप आऊट ” सुविधेचा लाभ, सुट्ट्या पैशांच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता

| Updated on: Apr 19, 2022 | 7:23 AM

बेस्ट नेहमीच आपल्या प्रवाशांकरता त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी नव्या-नव्या सुविधा उपलब्ध करून देत असते. अशीच एक सुविधा आता बेस्ट लवकरच प्रवाशांच्या सोईसाठी सुरू करणार आहे. या सेवेचे नाव ''टॅप इन टॅप आऊट " असे असणार आहे. अनेकदा प्रवास करताना आपल्याला चिल्लर पैशांची समस्या जाणवते. मात्र हीच समस्या दूर करण्यासाठी आता बेस्टकडून ''टॅप इन टॅप आऊट " नावाची नवी सुविधा दिली जाणार आहे.

बेस्टतर्फे आता टॅप इन टॅप आऊट  सुविधेचा लाभ,  सुट्ट्या पैशांच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता
Follow us on

मुंबई : लोकलनंतर बेस्टलाच (BEST) मुंबईकरांची जीवनवाहीनी माणण्यात येते. कोरोना काळात लोकल सेवा ठप्प होती. या काळात लाखो मुंबकरांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याचाे काम मुंबई महापालिकेच्या (bmc) बेस्ट बसने केले. कमी भाड्यात अत्याधुनिक सुविधा हे नेहमीच बेस्टचे वैशिष्ट राहिले आहे. बेस्ट नेहमीच आपल्या प्रवाशांकरता त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी नव्या-नव्या सुविधा उपलब्ध करून देत असते. अशीच एक सुविधा आता बेस्ट लवकरच प्रवाशांच्या सोईसाठी सुरू करणार आहे. या सेवेचे नाव ”टॅप इन टॅप आऊट ” असे असणार आहे. अनेकदा प्रवास करताना आपल्याला चिल्लर पैशांची समस्या जाणवते. मात्र हीच समस्या दूर करण्यासाठी आता बेस्टकडून ”टॅप इन टॅप आऊट ” (Tap in Tap Out ) नावाची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत हजर केली जाणार आहे. बेस्टकडून डिजिटल तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेंतर्गंत प्रवासी ऑनलाईन पेमेंट करू शकरणार आहेत.

”टॅप इन टॅप आऊट ” सुविधा नेमकी काय आहे?

बेस्टकडून डिजिटल तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बेस्ट लवकरच आपल्या प्रवाशांसाठी टॅप इन टॅप आऊट सुविधा सुरू करणार आहे. ही सुविधा 100 टक्के डिजिटल तंत्रज्ञानावर आधारीत आहे. प्रवास करताना प्रवाशांना नेहमीच सुट्या पैशांची अडचन भासते. हीच समस्या दूर करण्याचे काम प्रामुख्याने टॅप इन टॅप आऊट ही सुविधा करणार आहे. देशात सर्व सर्वप्रथम मुंबई बेस्टच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या सुविधेंतर्गंत ऑनलाईन भाडे देणे शक्य होणार आहे. बेस्टच्या “चलो स्मार्ट कार्ड” तसेच चलो मोबाइल या अ‍ॅपद्वारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती बेस्ट प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

दरम्यान या सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात  आले आहे. याबाबत बोलताना बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले की, टॅप इन टॅप आऊट ही सुविधा देशात सर्वप्रथम बेस्ट वापरत आहे. या सुविधेमुळे नागरिकांना प्रवास करणे आणखी सोपे होणार आहे. बेस्टकडून सध्या डिजिटल तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच प्रवाशांना ही नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इतर बातम्या

Today’s petrol, diesel prices : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

Inflation: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; पुढील महिन्यात एसी, फ्रीजचे दर देखील वाढणार?

SHARE MARKET: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मार्केट गडगडलं, सेन्सेक्स 1150 अंकांनी डाउन; 2 लाख कोटींचे नुकसान