AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेस्टची या दोन नव्या मार्गांवर प्रिमियम सेवा

बेस्टच्या नव्या प्रिमियम बस सेवेची सुरूवात ठाणे ते बीकेसी आणि वांद्रे ते बीकेसी अशी सुरू झाली होती. आता शनिवारपासून प्रिमियम बस सेवेचे आणखी दोन नवे मार्ग सुरू होत आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेस्टची या दोन नव्या मार्गांवर प्रिमियम सेवा
best premium busesImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 09, 2023 | 8:42 PM
Share

मुंबई : बेस्टने अलीकडेच लाॅंच केलेल्या प्रिमियम बससेवेचे  ( Best Premium Buses ) आणखी दोन नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. बेस्टची ( Best )  ही प्रिमियम बस सेवा आता मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ते खारघर आणि मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ते बॅकबे आगार ( दक्षिण मुंबई ) अशी सुरू करण्यात येणार आहे. येत्या शनिवार 11 फेब्रुवारीापासून या दोन बस सेवा सुरू होणार आहे. या चलो मोबाईल ( CHALO APP ) एपवरून या प्रिमियम बससेवेचे तिकीट प्रवाशांना ऑनलाईन बुक करता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन प्रिमियम बससेवा 

बेस्ट उपक्रमाने निकडेच बेस्ट चलो एपवर बाधारित प्रिमियम बससेवा सुरु केलेली असून या सेवांना प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. या  शनिवार दि. 11 फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शहराच्या खालील दोन बससेवा सुरू होत आहेत.

1 ) एयरपोर्ट सेवा  – 1 – आंतरराष्ट्रीय विमानतळ ते  बॅकबे आगार  ( दक्षिण मुंबई )

2 )  एअरपोर्ट सेवा – 2 – आंतरराष्ट्रीय विमानतळ ते  खारघर (  नवी मुंबई )

या बससेवेच्या नव्या मार्गांच्या वेळापत्रकाबाबतची  संपूर्ण माहिती चलो मोबाईल एपवर ‘चलो बस’ या पर्यायावर उपलब्ध करण्यात येत आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याकरिता आपल्या मोबाईलवर  चलो एप डाऊनलोड करावे असे  आवाहन बेस्टने केले आहे.

बेस्टच्या नव्या ‘प्रिमियम सेवेत’ प्रवाशांना ‘चलो मोबाईल’ एपवरुन तिकीट आरक्षित करता येत आहे. शिवाय या ‘चलो मोबाईल’ एपवरुन या बसला ट्रॅकही करण्याची सोय आहे. या सेवेसाठी धुर आणि ध्वनी प्रदुषणमुक्त इलेक्ट्रीक बसचा वापर केला असल्याने प्रवाशांना अत्यंत आरामदायी सफर घडणार आहे.  या बसेसमध्ये आरामदायी आसने, मोबाईल चार्जिंगसह सर्व सुख सुविधा असणार आहेत.

बसमध्ये उभे प्रवासी स्वीकारले जाणार नाही

बेस्टने आपल्या नव्या ‘प्रिमियम लक्झरी’ सेवेसाठी खास बस डिझाईन केली आहे. या बसमध्ये उभे प्रवासी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच कोणत्याही स्टाॅपवरून तुम्ही बसमध्ये जागा आहे की नाही हे मोबाईलवर पाहून तिकीट बुक करू शकणार आहात. तुम्ही कुठल्या स्टॉपवर उभे आहात ते कंडक्टरला दिसेल आणि त्या स्टॉपवर तुम्हाला घेऊनच बस पुढील प्रवासाला रवाना होईल अशी सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्माण करण्यात आली आहे. या बस सेवेची सुरूवात ठाणे ते बीकेसी आणि वांद्रे ते बीकेसी अशा टप्प्याने सुरू झाली होती. आता शनिवारपासून आणखी दोन नवे मार्ग सुरू होत असून त्यामुळे विमानतळावरील प्रवाशांना टॅक्सी शोधण्याच्या त्रासातून त्यांची सुटका होणार  असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे.

यापूर्वीचा मार्गाचे वेळापत्रक असा आहे

एक्सप्रेस रूट – ठाणे ते बीकेसी – दर अर्ध्या तासाने – स.7  आणि स. 8.30 तसेच बीकेसी ते ठाणे – सायं. 5.30 ते सायं. 7 तसेच

ऑल डे रूट – बीकेसी ते वांद्रे स्थानक – स. 8.50 आणि सायं. 5.50 तसेच उलट दिशेला स.9.25 आणि सायं. 6.25

‘प्रिमियम’ सेवेत महिला प्रवाशांसाठी खास ‘सेफ्टी फिचर’

बेस्टने या नव्या ‘प्रिमियम’ सेवेत महिला प्रवाशांसाठी खास ‘सेफ्टी फिचर’ आणले आहे. यात महिला प्रवासी घरी सुखरूप पोहचेपर्यंत त्यांची काळजी घेतली जाणार आहे. बेस्टच्या काॅलसेंटरचे कर्मचारी त्यासाठी ऑनलाईन पाठपुरावा करणार आहेत. ही सुविधा केवळ महिलांसाठीच उपयुक्त नसून एकट्याने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठीही फायद्याची असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...