AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या मुद्द्यावरून सरकारच्या शिष्टमंडळाला जेरीस आणलं, तोच मुद्दा जरांगे यांनी टाळला; छगन भुजबळ यांनी ठेवलं बोट

Chhagan Bhujbal on Jarange Patil : बीडमधील घेतलेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे यांनी केलेल्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा टाळला, ज्यावरून त्यांनी सरकारची गोची केली. याचाच धागा पकडत भुजबळांनी त्यावर बोट ठेवलं आहे.

ज्या मुद्द्यावरून सरकारच्या शिष्टमंडळाला जेरीस आणलं, तोच मुद्दा जरांगे यांनी टाळला; छगन भुजबळ यांनी ठेवलं बोट
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 23, 2023 | 7:20 PM
Share

मुंबई : मनोज जरांगे यांनी बीडमधील सभेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. मुंबईमधील आझाद मैदानावर आता आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. जरांगे 20 जानेवारीला आमरण उपोषणाला बसणार आहेत. या भाषणामध्ये येवल्याचं येडपट म्हणत जरागेंनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटील यांच्या भाषणावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आहे.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ  जरांगे यांना भेटण्यासाठी गेलं होतं.  त्यावेळी जरांगे यांनी आईची जात मुलाला लावावी अशी मागणी केली होती. य मागणीवरून त्यांनी शिष्टमंडळाला जेरीस आणलं होतं. मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. जरांगे यांनी शेवटपर्यंत आईची जात मुलाला लावण्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र आजच्या भाषणामध्ये जरांगेंनी या मुद्द्यावर काहीच भाष्य केलं नाही. याचाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

त्यांचं अर्ध भाषण फक्त भुजबळ यांच्यावरच होतं. नंतरच भाषण लेकरं वगैरे वगैरेवर होतं. भुजबळांवर बोललं नाही, टीका केली नाही तर भाषणात बोलणार काय? मी कालच म्हटलं व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा त्यांनी आज घेतला नाही. काय झालं माहीत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलत असल्याचं म्हणत भुजबळांनी कैचीत पकडलं. यावेळी भुजबळ यांनी बीडमधील झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरूनही टीका केली.

हॉटेल भुजबळ किंवा त्यांच्या माणसांनी जाळलं, असं सुरुवातीला म्हणाले. म्हणे मराठ्यांना डाग लावला. आधी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनी घरं आणि हॉटेल जाळलं. आता भुजबळांचं नाव घेत आहेत. थोड्यावेळाने म्हणतात, मराठ्याच्या वाट्याला जाऊ नका. बीडला काय होतं ते लक्षात ठेवा, म्हणजे बीडला जे झालं ते तुम्हीच केलं हे सिद्ध होतं ना? तुम्हीच कबूल केलं आहे. त्यामुळे त्यांनी थोडं आलोम, विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, त्यांच्या भाषणात विसंगीत येणार नाही, असा चिमटा भुजबळांनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?