मोठी बातमी | कल्याणमध्ये रेल्वे स्थानकावर स्फोटके आढळल्याने खळबळ

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कल्याण स्टेशनमध्ये स्पोटक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना बॉक्स संशय आल्यानंतर त्यांनी माहिती पोलिसांना दिली.

मोठी बातमी | कल्याणमध्ये रेल्वे स्थानकावर स्फोटके आढळल्याने खळबळ
| Updated on: Feb 21, 2024 | 6:53 PM

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकावरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर आज दुपारच्या दरम्यान डिटोनेटर स्फोटके आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे कल्याण स्टेशनच्या परिसरातील वडाच्या झाडाखाली एका बॉक्समध्ये एकूण 54 डिटोनेटर स्फोटके आढळले आहेत. कल्याण स्टेशन वरती काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यांना बॉक्स संशय आल्याने त्याने ही माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना दिली.

कल्याण रेल्वे पोलीस ,बॉम्बस्फोटचे पथक ,सिटी पोलीस डॉग्स स्कॉट, ATSची टीम घटनास्थळी दाखल होत दोन बॉक्स आपल्या ताब्यात घेत पोलीस तपास सुरू केला आहे. या डेटोनेटरच्या साह्याने जिलेटिनला जोडून मोठा स्फोट केला जाऊ शकतो असा संशय पोलिसांना असून सध्या पोलीस या प्रकरणात तपास सुरू केला आहे. आता हे दोन बॉक्स कोणाचे आहेत? कोणी आणले? जाणीवपूर्वक ठेवले होते का? सीसीटीव्हीच्य आधारे पोलीस तपास करत आहे.