मॉडेल विनयभंगप्रकरणात विनोद शेलार यांना मोठा दिलासा

मॉडेल विनयभंगप्रकरणात विनोद शेलार यांना मोठा दिलासा

मुंबई: भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विनोद शेलार यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या मॉडेलने आपण विनोद शेलार यांना ओळखतच नसल्याचं म्हटलं आहे. तसंच विनयभंगाबाबत जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, तो बनावट आणि स्क्रीप्टेड होता, असं या मॉडेलने म्हटलं आहे. तसा जबाब मॉडेलने पोलिसांसमोर दिला आहे. 

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विनोद शेलार यांच्यावर एका मॉडेलने विनयभंगाचा आरोप केला होता. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनुसार, विनोद शेलार यांनी मालाडमधील दहीहंडी कार्यक्रमात आपला विनयभंग केला, असा आरोप संबंधित मॉडेलने केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मात्र हा व्हिडीओ पत्रकार फ्लॅन रेडियन्स यांनी विनोद शेलारांचे राजकीय स्पर्धक ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरुन बनवल्याचं पोलिसांच्या चार्जशीटमधून समोर आलं.

दुसरीकडे हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं आता मॉडेलने म्हटलं आहे. विनोद शेलार यांच्याविरोधात बदनामीचा कट रचणाऱ्या ब्रिजेश सिंह आणि पत्रकार फ्लॅन रेडियन्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरुन व्हिडिओ केल्याचा आरोप आहे. विनोद शेलार यांना ब्लॅकमेल केल्यास बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवून देऊ, असं आमिष मॉडेलला दाखवलं होतं. मॉडेलने पोलिसांना दिलेल्या जबाबातून हा सर्व प्रकार समोर आला. ब्रिजेश सिंह हे विनोद शेलार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.

या मॉडेलला स्क्रीप्ट लिहून दिली होती. बिग बॉसमधील वाईल्ड कार्ड एण्ट्रीसाठी ती स्क्रीप्ट असल्याचं सांगितलं होतं, असं या मॉडेलने म्हटलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI