गेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य

| Updated on: Jan 18, 2021 | 12:05 AM

सरकारच्या काळात मोठा शिक्षक भरती घोटाळा झाला," असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले. (Big teacher recruitment scam In Last Government said Prakash Shendge)

गेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य
महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. अठरापगड जातींचं आरक्षण हडप करण्याचा त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला.
Follow us on

मुंबई : “गेल्या सरकारच्या काळात मोठा शिक्षक भरती घोटाळा झाला,” असे मोठे वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केले. “या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच रखडलेली भरती परत सुरु करा,” असेही प्रकाश शेंडगे म्हणाले. (Big teacher recruitment scam in Last Government said Prakash Shendge)

मागील सरकारच्या काळात मोठा शिक्षक भरती घोटाळा झाला. अडीच हजार शिक्षकांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम मागील सरकारने केले आहे. 12 फेब्रुवारी 2019 रोजी 10 हजार 361 पदांची शिक्षक भरती निघाली होती. मराठा संघटनांनी यास विरोध दर्शवल्याने शिक्षण उपसमितीच्या चारुशिला चौधरी यांनी 22 फेब्रुवारीला 50 टक्के जागाच भरण्याचा आध्यादेश काढला. यामुळे जवळपास 5 हजार मागासवर्गियांची भरती रखडली, असे प्रकाश शेंडगेंनी सांगितले.

धनगर समाजातील राहुल खरात आणि वंजारी समाजातील दत्ता नागरे या दोन शिक्षकांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका 3 एप्रिल 2019 ला दाख करण्यात आली आहे. या याचिकेवर मागील आठवड्यात सुनावणी झाली.

या सुनावणीदरम्यान शालेय शिक्षण विभागाने गंभीर चूक केल्याचं उघड झालं आहे. सध्या शिक्षकांची केवळ 2 हजार 431 पदं शिल्लक असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच अडीच हजार पदांचं काय झालं? याचा खुलासा करण्याची मागणी प्रकाश शेंडगेंनी केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करा. तसेच दोषींवर कारवाई करा आणि रखडलेली भरती पुन्हा करा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. (Big teacher recruitment scam In Last Government said Prakash Shendge)

संबंधित बातम्या : 

‘त्या’ झारीतल्या शुक्राचार्यांचा छगन भुजबळ शोध घेणार; प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास…, प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा