AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींवरील चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 24 एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 5 एप्रिल 2019 ठरवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव […]

मोदींवरील चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला!
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 24 एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 5 एप्रिल 2019 ठरवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन 11 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे आयोजन केलं होतं. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस आधी राजकीय व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित कसा होऊ शकतो, असा प्रश्न काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारला होता. तसेच हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली होती.

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची ही मागणी मान्य करत, लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करावा असे आदेश दिग्दर्शकांना दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल 23 एप्रिलला जाहीर होणार आहेत. हे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिलला नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर संदीप सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

एक जबाबदार नागरिक असल्याच्या नाते आम्ही देशाच्या कायद्याचा सन्मान करतो. यावर चित्रपटाच्या टीमशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा चित्रपट लोकसभा निवडणुकानंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार येत्या 24 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असं चित्रपटाचे प्रोड्यूसर संदीप सिंह यांनी सांगितले

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. या चित्रपटाची टॅगलाईन ‘देशभक्ती ही मेरी शक्ती’ अशी आहे. नरेंद्र मोदींचा बायोपिक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर 23 भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. उमर कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातून मोदी यांच्या एक भाऊ, पुत्र, सेवक, नेता, योगी अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.