AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ व्हिडीओची राज्य महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या…

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जोडो मारत आंदोलन करत तीव्र निषेध केला जात आहे. अशातच आता या व्हायरल व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या यांच्या 'त्या' व्हिडीओची राज्य महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 18, 2023 | 7:42 PM
Share

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कायम विरोधी पक्षातील नेत्यांवर बेधडकपणे आरोप करणाऱ्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. सोमय्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जोडो मारत आंदोलन करत तीव्र निषेध केला जात आहे. अशातच आता या व्हायरल व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना सूचना केल्या आहेत. घटनेचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारित झाला. त्यानंतर राज्यभरातून अनेक सामाजिक संस्थांनी विचारणा केली. राज्य महिला आयोगाने या व्हिडीओची दखल घेत मुंबई पोलीस आय़ुक्तांना पत्र पाठवत या घटनेचा तपास करत वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. जर पीडित महिलांनी येऊन तक्रारी दाखल केली तर आपण कारवाई करत असल्याचंही चाकणकरांनी सांगितलं.

किरीट सोमय्यांचं स्पष्टीकरण?

किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. “मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जातायेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांनी याआधी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षामधील नेत्यांविरोधात पुरावे सादर करत त्यांना लवकरच तूरूंगात पाठवणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता शिंदे गट आणि अजित पवार  गट भाजपसोबत असल्याने सोमय्यांची गोची झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान,  ज्या नेत्यांची नाव घेत त्यांना आपण जेलमध्ये टाकणार असल्याचं सोमय्या सांगत होते. यामधील काही नेते आता भाजपसोबत सत्तेत असल्याने सोमय्यांवरच निशाणा साधताना दिसत आहे.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर