“भाजपा गंजलेला बांबू तर तुमची उबाटा म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी”, भाजपा आमदाराचा हल्लाबोल

भाजपा आमदाराने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर आहे. महिला आरक्षणाची भीती राऊतला वाटण हे रास्त आहे अशी टीका या भाजपा आमदाराने केली.

भाजपा गंजलेला बांबू तर तुमची उबाटा म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी, भाजपा आमदाराचा हल्लाबोल
sharad pawar-uddhav thackeray
| Updated on: Sep 27, 2023 | 11:57 AM

मुंबई (महेश सावंत) : “सामनाच्या अग्रलेखातून गांजलेल्या आणि गंजलेल्यावर भाष्य केले. काँग्रेसला काही बोललं, की लाल आणि हिरव्या मिरच्या राऊतला लागतात. काँग्रेसचे नवे मुखपत्र म्हणजे सामना. जेवढं काँग्रेसला झोम्बल नाही, तेवढं राऊतला झोम्बल” अशी टीका भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केली. “भाजपा गंजलेला बांबू तर तुमची उद्धव बाळसाहेब ठाकरे म्हणजे पवारांनी थुंकलेली सुपारी” अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली. “अरबन नक्षल आणि संजय राऊत यांचा संबंध आहे का?. दोघांचे गुण समान वाटतात. केंद्र सरकारने अरबननक्षल आणि संजय राऊत यांचे संबंध आहेत का? याचा तपास करावा” असं नितेश राणे म्हणाले. “आदित्य ठाकरेंच्या ट्विट मुळे एक माशी मरत नाही. मुख्यमंत्री राज्याच्या गुंतवणुकीसाठी बाहेर गावी जातात. तुमचा मालक मुख्यमंत्री असताना दावस दौरे का झाले?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.

“जेव्हा उद्धव ठाकरे सिरीयस होते, तेव्हा त्यांचा मुलगा परदेश दौरे करत होता. वडील आजारी असताना मी मुख्यमंत्री कसा बनेन त्याचा विचार आदित्य करत होता. आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी अडचणीत आल्याने आपला दौरा रद्द केला. आदित्य ठाकरेने आजोबांची पुण्यतिथी असताना दौरा रद्द केला नाही. असा विकृत पुत्र कुठल्याही वडीलांना होऊ नये” असं नितेश राणे म्हणाले. “तुमचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार दिवाळी अधिवेशनात मंत्री असतील बारीक लक्ष ठेवा. मोहित कंबोज यांची माहिती योग्य आहे. संजय राऊतला पवार कुटुंबीय फार चांगले माहीत आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘राजकारणातील शक्ती कपूर जेल मध्ये असणार’

“महिला आरक्षणाचा सर्वात जास्त त्रास संजय राऊतला होणार आहे. राजकारणातील शक्ती कपूर जेल मध्ये असणार. महिला आरक्षणाची भीती राऊतला वाटण हे रास्त आहे. राऊतने कितीही विरोध केला, तरीही 2024 नंतर महिला निवडून येणार आणि संजय राऊतला अटक होणार” असं नितेश राणे म्हणाले. “कितीही कोणीही पुड्या सोडल्या, तरी अजित दादा फडणवीस आणि शिंदे या त्रिशूळाला कोणीही बाजूला करू शकत नाही. आमचे तिन्ही नेते एकत्र राहतील” असा दावा नितेश राणे यांनी केला.