महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडतंय, आशिष शेलार महत्त्वाचा मेसेज घेऊन ‘वर्षा’वर दाखल

हातात काही कागदपत्र घेऊन शेलार वर्षावर दाखल झाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचा संदेश घेऊन शेलार आल्याची सूत्रांची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडतंय, आशिष शेलार महत्त्वाचा मेसेज घेऊन 'वर्षा'वर दाखल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 10:38 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आता आशिष शेलार वर्षा बंगल्यावर दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली होती. त्यानंतर शरद पवार यांची आज मुख्यमंत्री यांची अचानक भेट झाली. आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले. हातात काही कागदपत्र घेऊन शेलार वर्षावर दाखल झाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचा संदेश घेऊन शेलार आल्याची सूत्रांची माहिती आहे.

आशिष शेलार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले. राजकीय भेटीगाठीचं हे सत्र आता सुरू आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आशिष शेलार हेसुद्धा वर्षा बंगल्यावर पोहचले. या भेटीमागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, राजकीय भेटीगाठींचे हे सत्र सुरूच आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. वर्षा निवासस्थानाबाहेर आल्यानंतर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावेळ वेगवेगळे तर्क लावले जात होते. पण, शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं.

मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा केली. शिवाय सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या आणि इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार हे मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आले होते. या संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. शरद पवार यांची सदिच्छा भेट होती, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः सांगितलं.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.