AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेसाठी भाजपचे इतक्या नगरसेवकांचे टार्गेट; प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत काय घडलं?

प्रत्येक बूथमध्ये 11 जणांची समिती असेल. फ्रेंड्स ऑफ भाजप ही संकल्पना पुढे घेऊन जा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मुंबई महापालिकेसाठी भाजपचे इतक्या नगरसेवकांचे टार्गेट; प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत काय घडलं?
| Updated on: Feb 12, 2023 | 2:46 PM
Share

मुंबई : मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित आहेत. मुंबईत महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत १५० नगरसेवक निवडून येतील. या दृष्टीने भाजप नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या कार्याकाळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा राजकीय ठराव मांडण्यात आला. त्यानुसार प्रत्येक विभागात जाऊन हे मांडले जाईल. प्रत्येक वॉर्डामध्ये विरोधकांची स्थानिक पातळीवरील चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणा, असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी केले.

कार्यकर्त्यांना दिल्या या सूचना

ज्या विभागात भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद नाही, त्याठिकाणी पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यात येईल. विविध कार्यक्रम राबवण्यासाठी निर्णय झाले आहेत. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहविण्यासाठी काम करण्याचा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

सोशल मीडियावर देणार भर

मुंबईतील मूलभूत सोयीसुविधा लोकांना मिळाल्यात का हे पाहा आणि त्या आपल्यामार्फत पोहचवा. असे आवाहनही भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देण्याविषयी मार्गदर्शन झाले.

असे राहील उमेदवारीचे सूत्र

जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजपचा उमेदवार दिला जाईल. जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला जोर लावावा. त्या जागा आपण लढवू असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.

आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे. ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी मांडले.

शेलार म्हणतात, भाजपचा महपौर बसणार

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, भाजपशी तुम्ही विश्वासघात केला म्हणून तुम्हाला भटकावे लागत आहे. भाजप या निवडणुकीत 150 जागा जिंकणार आणि भाजपचा महापौर बसणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक बूथमध्ये 11 जणांची समिती असेल. फ्रेंड्स ऑफ भाजप ही संकल्पना पुढे घेऊन जा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश चालवत आहेत. त्यांचे सारथी हे देवेंद्र फडणवीस आहेत. चांगल्या लोकांचा उपयोग कुठे, कधी कसं करून घ्यायचा आहे ते आशिष शेलार यांना माहीत आहे. लढाई सुरू झाली आहे. निवडणुकीच्या मूडमधून इथून बाहेर पडायचं आहे. आपल्या पक्षात रोज पक्ष प्रवेश होत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.