कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत जोरदार तयारी; 300 बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. | Coronavirus third wave Mumbai

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत जोरदार तयारी; 300 बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 8:00 AM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेल्या मुंबईत आता प्रशासनाने आगामी संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जोरदार तयारी सुरु केली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पालिका आणि खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. आतापर्यंत मुंबईतील 300 बालरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. (Preparation for Covid 19 third wave in Mumbai)

तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी 10 ते 15 बेडसचे वॉर्ड आहेत. तर मुलुंड जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 100, नेस्कोमध्ये 100 ते 200 तर दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 100 बेडस् राखीव ठेवण्यात आले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

रविवारी महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी म्हणजे 12557 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून मुंबईतील परिस्थितीही जवळपास नियंत्रणात आली आहे. मुंबईत सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5.56 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के इतके आहे. तर कोरोनाचा डबलिंग रेट 511 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीशी उसंत मिळाली असून या वेळेत पालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी मृतांचा आकडा चिंताजनक आहे. राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये आतापर्यंत एक लाख 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक 14971 मृत्यू मुंबईतील तर 13348 मृत्यू पुण्यातील आहेत.

संबंधित बातम्या:

‘चार दिवसांत केंद्राकडून पुण्यासाठी सिरमची लस आणा, अन्यथा भाजपविरोधात घंटानाद आंदोलन करु’

कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील नाहीत, जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

कोरोनाची तिसरी लाट आली तर उद्योग थांबता कामा नये: उद्धव ठाकरे

(Preparation for Covid 19 third wave in Mumbai)

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.