‘चार दिवसांत केंद्राकडून पुण्यासाठी सिरमची लस आणा, अन्यथा भाजपविरोधात घंटानाद आंदोलन करु’

येत्या चार दिवसांत परवानगी मिळवावी अन्यथा कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या पुण्यातील भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने घंटानाद आंदोलन केले जाईल | BJP Serum congress

'चार दिवसांत केंद्राकडून पुण्यासाठी सिरमची लस आणा, अन्यथा भाजपविरोधात घंटानाद आंदोलन करु'
कोवीशिल्ड लस
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 2:23 PM

पुणे: सामाजिक बांधिलकी म्हणून पुण्यासाठी कोविशील्ड लसीचे 25 लाख डोस देण्याची तयारी सिरम इन्स्टिट्यूटने दाखविली असून त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. तीन आठवडे उलटून गेले तरीही, भाजपचे (BJP) नेते केंद्र सरकारची परवानगी मिळवू शकलेले नाहीत. त्यांनी येत्या चार दिवसांत परवानगी मिळवावी अन्यथा कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या पुण्यातील भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे. (BJP leaders should Bring Serum covishield vaccine for Pune says Congress)

कोविड साथ निवारणासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे माहीत असतानाही केवळ टक्केवारी आणि अंतर्गत कलह यात भाजपचे नेते गुंतलेले आहेत या आरोपाचा पुनरुच्चार मोहन जोशी यांनी केला. सीरमने लस देण्याची तयारी दाखवली असली तरी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी लवकरच आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांची भेट घेणार आहोत, असे विधान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते.

वास्तविक, दिल्लीत प्रकाश जावडेकर हे वजनदार मंत्री आणि खासदार गिरीश बापट असताना महापौरांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्याची गरजच काय? ही टाळाटाळ करण्यामागे महापौरांचे टक्केवारीचे राजकारण आहे का? जावडेकर आणि बापट कुंभकर्णाप्रमाणे निद्रिस्त झाले आहेत का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला असून पुणेकरांसाठी एकेक दिवस महत्त्वाचा असताना भाजप नेत्यांची बेफिकीरी संतापजनक आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘अंतर्गत कलह बाजुला सारुन पुण्यासाठी लस उपलब्ध करा’

भाजप नेत्यांनी आपले अंतर्गत कलह बाजूला ठेवून कोविड लस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पुणेकरांच्या जिवाशी खेळू नये असे आवाहन दिनांक 31 मे रोजी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन केले होते. त्यालाही आठवडा उलटून गेला. तरीही महापालिकेतील सत्ताधारी भाजपची त्यादृष्टीने हालचाल दिसत नाही म्हणून आम्ही घंटानाद आंदोलनाचे पाऊल उचलत आहोत. पुणेकरांना तातडीने लस मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करेल असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

(BJP leaders should Bring Serum covishield vaccine for Pune says Congress)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.