‘अदर पुनावाला ‘डाकू’, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’, भाजप आमदाराने तारे तोडले

गोरखपूरच्या भाजप खासदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. अदर पुनावाला (Adar Poonawala) हे डाकू आहेत. केंद्र सरकारनं साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घेण्याची मागणी केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:22 PM, 22 Apr 2021
'अदर पुनावाला 'डाकू', सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या', भाजप आमदाराने तारे तोडले
भाजप आमदार राधा मोहन दास अग्रवाल यांची अदर पुनावाला यांच्यावर टीका

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute) ‘कोविशील्ड’ लसीची किंमत ठरवण्यात आल्यानंतर गोरखपूरच्या भाजप आमदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. अदर पुनावाला (Adar Poonawala) हे डाकू आहेत. केंद्र सरकारनं साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घेण्याची मागणी केलीय. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII)कोविशील्ड (Covishield Vaccine) लशीची नवीन किंमत नुकतीच निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराने हे वक्तव्य केलंय. (Gorakhpur BJP MLA Radhamohandas Agrawal criticizes Adar Poonawala)

काय म्हणाले भाजप आमदार?

सीरमने कोविशील्ड लसीची किंमत ठरवल्यानंतर गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावर हल्ला चढवलाय. यावेळी अग्रवाल यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत अदर पुनावाला यांचा डाकू असा उल्लेख केलाय. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. ‘अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे’ असं ट्वीट त्यांनी केलंय.

कोविशील्डची किंमत काय?

सीरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे. एसआयआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “येत्या दोन महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढेल. आमच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल.” जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या लशीची किंमत प्रति डोस 1500 रुपये आहे, रशियन लसची किंमत 750 रुपये आहे आणि चिनी लशीसाठी प्रति डोस 750 रुपये मोजावे लागत असल्याचं सीरमने म्हटलंय.

1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचं लसीकरण

केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1 मेपासून लस देण्याची घोषणा केली होती आणि असेही म्हटले होते की, लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यातील भाग लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेमधून (सीडीएल) 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला द्यावा आणि उर्वरित 50 टक्के पुरवठा राज्य सरकारांना व खुल्या बाजारात विकण्यास त्यांना परवानगी असेल.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : ‘कोरोना लसीची समान किंमत निश्चित करा’, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाांधीची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Corona Vaccine : डबल म्यूटेंट व्हायरसवरही भारत बायोटेकची Covaxin लस प्रभावी, ICMRकडून स्पष्ट

Gorakhpur BJP MLA Radhamohandas Agrawal criticizes Adar Poonawala