AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Budget : मुंबई महापालिकेचं आता अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठं पाऊल, होणार QR code प्रमाणपत्राचा वापर

बुधवारी मुंबई महापालिकेचा सन २०२६ - २७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांकडून सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा ८.७७ कोटी रुपयांनी अधिक आहे.

BMC Budget : मुंबई महापालिकेचं आता अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठं पाऊल, होणार QR code प्रमाणपत्राचा वापर
BMC BudgetImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 4:40 PM
Share

बुधवारी मुंबई महापालिकेचा सन २०२६ – २७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांकडून सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा ८.७७ कोटी रुपयांनी अधिक आहे. मुंबई महापालिकेचा सन २०२५–२६ या वर्षासाठी महापालिकेचा एकूण अर्थसंकल्प ७४,४२७.४१ कोटी रुपये इतका होता. तर सन २०२६ – २७ या आर्थिक वर्षासाठी आता ८०९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येताच फेरीवाला धोरणात बदल करण्यात आला असून, नवीन फेरीवाल धोरण जाहीर करण्यात आलं आहे.

नव्या धोरणानुसार  अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच आता अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR code आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अधिकृत नसलेले फेरीवाले ओळखणं सोपं होणार असून,  अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र केली जाणार आहे.

ग्रीन बॉन्डस्

दरम्यान मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्डस् वितरीत केले जाणार आहेत,  मुंबईतील विविध मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा यांकरता निधी उभारण्याकरता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्डस देण्यात येणार आहेत. एकाच वेळी निर्गमीत केलेल्या १००० कोटींच्या बॉन्डस करता केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान मिळणार आहे.

तसेच  मुंबई महानगर पालिकेकडून पूल बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.  मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी 24 कामे पूर्ण झाली असून मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत.  2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तर 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे. नवीन पूल बांधणीसाठी, पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  यामध्ये कोस्टल रोडच्या 6 व्या टप्याचा देखील समावेश आहे. वर्सोवा दहिसरच्या कोस्टल रोडसाठी एकूण 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  तर  गोरेगाव मुलुंड लिंक रोड साठी 2 हजार 650 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...