AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 : मतदानावेळी गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, प्रत्येक हालचालीवर करडी नजर, पोलिसांचा मास्टरप्लॅन काय?

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून २८,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १६ जानेवारीला मतमोजणी होईल.

BMC Election 2026 : मतदानावेळी गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, प्रत्येक हालचालीवर करडी नजर, पोलिसांचा मास्टरप्लॅन काय?
BMC
| Updated on: Jan 14, 2026 | 9:20 AM
Share

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. काल संध्याकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच शांततापूर्व स्थितीत मतदान व्हावे, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

मुंबईतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा आराखडा राबवण्यात आला आहे. यानुसार उद्या मुंबईत १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपायुक्त (DCP) आणि ८४ सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तैनात असणार आहेत. त्यासोबतच ३,००० हून अधिक पोलीस अधिकारी आणि २५,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी/होमगार्ड यांचा फौजफाटाही सज्ज असणार आहे.

तसेच मुंबईतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव पोलीस दल (SRPF), क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथके (BDDS) तैनात असणार आहेत.

मुंबईत उद्या सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी ५:३० पर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. मतदानाच्या दिवशी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शेअर बाजार (NSE/BSE) सुरू राहणार असून सेटलमेंटसाठी पुढील दिवसाचा कालावधी दिला जाईल. मतदानानंतर लगेचच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचे आवाहन

उद्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कुठे-कुठे होणार मतदान?

  • मुंबई महानगर क्षेत्र (MMR): मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल.
  • उत्तर महाराष्ट्र: नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर (अहमदनगर).
  • पश्चिम महाराष्ट्र: पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, कोल्हापूर.
  • मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, नांदेड-वाघाळा, जालना.
  • विदर्भ: नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर.

मतदारांसाठी महत्त्वाची माहिती

  • मतदानाची वेळ: सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०.
  • निकाल: १६ जानेवारी २०२६.
  • मतदान पद्धत : मुंबईत एका प्रभागातून एकच उमेदवार निवडायचा आहे, तर उर्वरित २८ शहरांत बहुसदस्यीय (एका प्रभागात ३ ते ५ उमेदवार) पद्धत आहे.
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.