ठाकरेंच्या शिवसेनेचे 92 शिलेदार मैदानात, तुमच्या वॉर्डमधून कोणाला उमेदवारी? संपूर्ण यादी एकदा वाचा

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. ९२ उमेदवारांची नावे आणि त्यांचे प्रभाग क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ठाकरेंच्या शिवसेनेचे 92 शिलेदार मैदानात, तुमच्या वॉर्डमधून कोणाला उमेदवारी? संपूर्ण यादी एकदा वाचा
Uddhav thackeray
| Updated on: Dec 30, 2025 | 12:04 PM

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आगामी २०२६ च्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय गणित बदलल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार आहे. या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे ५२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट सुमारे १६० ते १६५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील २२७ जागांच्या गणितात मनसेला ५२ जागा सोडण्यात आल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट १६० ते १६५ जागा लढवण्याच्या तयारीत असून आतापर्यंत त्यांनी ९२ पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यांची नावे समोर आली आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी १० ते १२ जागा सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईसह राज्यातील महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही मोठी खेळी खेळली आहे.

शिवसेना ठाकरे गटांच्या उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक (Ward No.) उमेदवाराचे नाव
1 फोरम परमार
2 धनश्री कोलगे
3 रोशनी गायकवाड
4 राजू मुल्ला
5 सुजाता पाटेकर
7 सौरभ घोसाळकर
9 संजय भोसले
12 सारिका झोरे
13 आसावरी पाटील
16 स्वाती बोरकर
25 माधुरी भोईर
26 धर्मेंद्र काळे
29 सचिन पाटील
41 सुहास वाडकर
47 शंकर गुरव
49 संगीता सुतार
54 अंकित प्रभू
56 लक्ष्मी भाटिया
57 रोहन शिंदे
59 शैलेश फणसे
60 मेघना विशाल काकडे माने
61 सेजल दयानंद सावंत
62 झीशान चंगेज मुलतानी
63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर
64 सबा हारून खान
65 प्रसाद आयरे
75 प्रमोद सावंत
87 पूजा महाडेश्वर
89 गितेश राऊत
93 रोहिणी कांबळे
95 हरी शास्त्री
100 साधना वरस्कर
105 अर्चना चौरे
109 सुरेश शिंदे
111 दीपक सावंत
114 राजोल पाटील
117 श्वेता पावसकर
118 सुनीता जाधव
120 विश्वास शिंदे
122 निलेश साळुंखे
123 सुनील मोरे
124 सकीना शेख
125 सतीश पवार
126 शिल्पा भोसले
127 स्वरूपा पाटील
130 आनंद कोठावदे
132 क्रांती मोहिते
134 सकीना बानू
135 समीक्षा सकरे
137 महादेव आंबेकर
138 अर्जुन शिंदे
141 विठ्ठल लोकरे
142 सुनंदा लोकरे
144 निमिष भोसले
148 प्रमोद शिंदे
153 मीनाक्षी पाटणकर
155 स्नेहल शिवकर
156 संजना संतोष कासले
157 डॉ. सरिता म्हस्के
158 चित्रा सोमनाथ सांगळे
160 राजेंद्र पाखरे
164 साईनाथ साधू कटके
167 सुवर्णा मोरे
168 सुधीर खातू वार्ड
173 प्रणिता वाघधरे
179 दीपाली खेडेकर
180 अस्मिता गावकर
182 मिलिंद वैद्य
184 वर्षा वसंत नकाशे
185 टी. एम. जगदीश
187 जोसेफ कोळी
189 हर्षला मोरे
190 वैशाली पाटील
191 विशाखा राऊत
194 निशिकांत शिंदे
195 विजय भणगे
196 पद्मजा चेंबूरकर
198 अबोली खाड्ये
199 किशोरी पेडणेकर
200 उर्मिला पांचाळ
201 रेखा कांबळे
206 सचिन पडवळ
208 रमाकांत रहाटे
210 सोनम जामसूतकर
213 श्रद्धा सुर्वे
215 किरण बालसराफ
218 गीता अहिरेकर
219 राजेंद्र गायकवाड
220 संपदा मयेकर
222 संपत ठाकूर
225 अजिंक्य धात्रक
227 रेहाना गफूर शेख

महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र काय?

  • शिवसेना (UBT): १६० – १६५ जागा
  • मनसे: ५२ जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष): १० – १२ जागा