मुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात

कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्नात प्रचंड तूट निर्माण झाली आहे

मुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात
bmc
| Updated on: Sep 19, 2020 | 1:22 PM

मुंबई : कोरोना संकटामुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या (BMC Financial Condition Due To Corona) मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्नात प्रचंड तूट निर्माण झाली आहे (BMC Financial Condition Due To Corona).

परिणामी मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागत आहे. आतापर्यंत कोरोना संदर्भातील गोष्टींवर सुमारे 1300 कोटी रुपयांवर खर्च करण्यात आला आहे. ज्यापैकी 900 कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत.तर उर्वरीत निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागला आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने यंदा 1400 कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे.

जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला 1 हजार कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती आहे.

BMC Financial Condition Due To Corona

संबंधित बातम्या :

मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार

‘घाबरुन जाऊ नका’, मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण