कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस

| Updated on: Sep 13, 2020 | 5:05 PM

वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला लवकरच एक नवा झटका बसण्याची शक्यता आहे (BMC notice to Kangana Ranaut for illegal construction).

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, या 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस
Follow us on

मुंबई : वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला लवकरच एक नवा झटका बसण्याची शक्यता आहे (BMC notice to Kangana Ranaut for illegal construction). मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कंगना रनौतच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केल्यानंतर आता तिच्या खारमधील घरालाही बेकायदेशी बांधकामाप्रकरणी नोटीस दिली आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

बीएमसीने म्हटलं आहे, “कंगना रनौतच्या घरात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयापेक्षाही अधिक घरात बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. दरम्यान, कंगनाच्या घरातील अवैध बांधकामाचा खटला सध्या सुरु आहे. त्याची पुढील सुनावणी 25 सप्टेंबरला होणार आहे. कंगना रनौत मुंबईतील खार (पश्चिम) राहते. ऑरकिड ब्रिजच्या 16 क्रमांच्या एका इमारतीच्या 5 व्या मजल्यावर तिचे 3 फ्लॅट आहेत. एक फ्लॅट 797 चौरस मीटर, दुसरा फ्लॅट 711 चौरस मीटर आणि तिसरा फ्लॅट 459 चौरस मीटरचा आहे. 8 मार्च 2013 रोजी या तिन्ही फ्लॅटची कंगनाच्या नावावर नोंद झाली आहे.

कंगनाने हे फ्लॅट घेतल्यानंतर 5 वर्षांनी 13 मार्च 2018 रोजी बीएमसीला या फ्लॅट्समध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेलं आढळलं. याबाबतच्या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 मध्ये बीएमसीकडून कंगनाच्या फ्लॅट्सची पाहणी करण्यात आली. त्याच दिवशी कंगनाला बीएमसीने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस दिली.

बीएमसीने कंगना रनौतला पाठवलेल्या नोटीसमध्ये फ्लॅटमध्ये 8 प्रकारचं बेकायदेशीर बांधकाम केल्याचं म्हटलं आहे.

1. इलेक्ट्रिक फिटिंगचे संक सिमेंटने भरण्यात आले आणि त्याचा उपयोग कार्पेट एरिया म्हणून करण्यात आला.

2. झाडं लावण्यासाठी असलेल्या जागेवर पायऱ्या करण्यात आल्या.

3. खिडकीवर लावण्यात आलेल्या छज्जाच्या भिंती काढून त्याचा उपयोग बाल्कनी म्हणून करण्यात येत आहे.

4. सर्विस स्लॅब संक सिमेंटने भरला आहे आणि त्याच्या शेजारची भिंत तोडून त्याचं रुपांतर बाल्कनी आणि रुममध्ये करण्यात आलं.

5. उत्तर-पश्चिम दिशेने पायऱ्या आणि स्वयंपाकघर यामध्ये सामाईक रस्ता आणि स्वयंपाक घराजवळ दरवाजा बनवण्यात आलाय.

6. 3 फ्लॅट्समध्ये असलेल्या सामाईक जागेवर लिफ्टच्या समोरच बेकायदेशीर दरवाजे तयार करण्यात आले आहेत.

7. तिन्ही फ्लॅट्सला जोडण्यासाठी विनापरवानगी सामाईक भिंत तोडण्यात आली.

8. शौचालय आणि बाथरुमजवळील पाईपचा आकार बदलण्यात आला आहे किंवा झाकून टाकण्यात आल्या आहेत.

बीएमसीने या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कंगनाला उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ते बांधकाम हटवण्याचा इशारा देण्यात आला. 22 मे 2018 रोजी या प्रकरणी सिव्हिल कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता बीएमसीने न्यायालयाकडे तात्काळ कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. याचीच सुनावणी 25 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या :

कंगना रनौत राजभवनावर, BMC कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारींची भेट

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार : उद्धव ठाकरे

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका

BMC notice to Kangana Ranaut for illegal construction