CORONA | मुंबईत आयसोलेशनसाठी SRA ची आणखी 10 हजार घरं ताब्यात घ्या, सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

| Updated on: May 21, 2020 | 12:01 AM

मुंबईतील एस.आर.ए विभागाकडे तयार असलेली 10 हजार घर ताब्यात घ्या, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे. (SRA Home For isolation Anil Galgali demand)

CORONA | मुंबईत आयसोलेशनसाठी SRA ची आणखी 10 हजार घरं ताब्यात घ्या, सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांना ठेवण्यासाठी किंवा आयसोलेशनसाठी मुंबईतील एस.आर.ए विभागाकडे तयार असलेली 10 हजार घर ताब्यात घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिका मोठी तयारी करत आहे. मात्र तरीही पालिकेकडे रुग्णांना उपचार करण्यासाठी आयसोलेशनच्या जागा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी या घरांचा मोठा उपयोग होऊ शकतो, असे गलगली यांचं म्हणण आहे. (SRA Home For isolation Anil Galgali demand)

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई हा कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका उपाय योजना करत आहेत. पालिकेने आतापर्यंत अनेक शाळा ताब्यात घेतल्या आहे. तसेच मोठी मैदान, स्टेडिअम ही ताब्यात घेण्याचा विचार पालिका अधिकारी करत आहेत.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. मुंबईत एसआरएची काम जोरात सुरु होतात. त्यातून हजारो घर उपलब्ध झाली आहेत. यापैकी 2080 घर एस आर ए ने आधीच दिली आहेत. मात्र आणखी दहा हजार घर ताब्यात घेतल्यास कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला अलगीकरणासाठी उपयोग होऊ शकतो.

सध्या महानगरपालिका वानखेडे स्टेडियमवर आदी मैदानांवर आयसोलेशन कक्ष उभारण्याचा विचार करत आहे. पण यासाठी मोठा खर्च आहे. त्याऐवजी ही तयार घर ताब्यात घेतल्यास पालिकेचा खर्च वाचेल, असं अनिल गलगली यांचं म्हणणं आहे. (SRA Home For isolation Anil Galgali demand)

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल

सर्वांच्या कोरोना टेस्टच्या मागणीची याचिका कोर्टाने फेटाळली, मात्र केंद्राकडून मागणी मान्य : अनिल गलगली