सर्वांच्या कोरोना टेस्टच्या मागणीची याचिका कोर्टाने फेटाळली, मात्र केंद्राकडून मागणी मान्य : अनिल गलगली

लोकसंख्या आणि झोपडपट्टीची घनता लक्षात घेता ही मागणी व्यावहारिक नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. (Mumbai HC Reject Home to Home Corona Test)

सर्वांच्या कोरोना टेस्टच्या मागणीची याचिका कोर्टाने फेटाळली, मात्र केंद्राकडून मागणी मान्य : अनिल गलगली

मुंबई : कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांची होम टू होम टेस्ट करा, अशी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते अनील गलगली यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. लोकसंख्या आणि झोपडपट्टीची घनता लक्षात घेता ही मागणी व्यावहारिक नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. (Mumbai HC Reject Home to Home Corona Test)

मुंबईत कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात आहे. हा आकडा सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना लवकरात लवकर उपचार मिळावा म्हणून मुंबईतील नागरिकांची होम टू होम टेस्ट होणं गरजेचं आहे, या मागणीसाठी अनिल गलगली यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका केली होती.

मात्र मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. मुंबईची लोकसंख्या आणि झोपडपट्टीची घनता लक्षात घेता ही मागणी व्यावहारिक नाही. ही मागणी पूर्ण करण्यास अडचणी आहेत, असे नमूद करत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. मात्र, केंद्र सरकारने लॉकडाऊन 4.0 च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये गलगली यांच्या सूचना मान्य केल्या आहेत. (Mumbai HC Reject Home to Home Corona Test)

दररोज वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह घटनांकडे लक्ष देऊन मुंबईत घरोघरी स्क्रीनिंगची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मुंबईतील कोरोना घटनांचा वाढता कल पाहता त्यांनी ही मागणी मान्य केली आहे.

यामुळे सकारात्मक आणि आक्रमकपणे कोरोना रुग्णांचा शोध घेण्यावर भर देण्यात येईल. जेणेकरून त्यांच्यावर त्वरित उपचार करता येऊ शकतात. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख होईल. यामुळे कोरोनाच्या रुग्णात घट होईल.

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, केंद्र सरकारने कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शोधून काढण्यावर भर दिला आहे. यात घरोघरी पाळत ठेवण्याची तसेच कंटमेंट झोनमध्ये रोग पसरणार नाही यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना अनिल गलगली यांनी केल्या होत्याच. या सर्व सूचना केंद्र सरकारने शिफारस करण्यात आहे. (Mumbai HC Reject Home to Home Corona Test)

संबंधित बातम्या : 

Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घट

Malegaon Corona | मालेगावात नवे कोरोनाग्रस्त घटले, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *