
सैफ अली खान याच्या चाहत्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. सैफ आता धोक्याबाहेर आहे. गुरूवारी भल्या पहाटे चोरट्याने त्याच्या घरात प्रवेश केला. एक कोटी रुपये देण्याची मागणी करत त्याने चाकू हल्ला केला. त्याने सैफवर सहा वार केले. त्यातील दोन अत्यंत गंभीर होते. सैफला खोलवर जखम झाली होती. सैफ याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची तब्येत स्थिर आहे. लीलावती रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान डॉक्टरांनी केलेल्या दाव्यामुळे फॅन्सची चिंता कमी झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जर चाकू अजून अधिक खोल गेला असता तर सैफला लकवा झाला असता. त्याचे पुढील करिअर धोक्यात आले असते.
छोट्या नवाबाचे दैव बलवत्तर
सैफ अली खान याच्या शरीरावर 6 ठिकाणी वार झाले होते. यातील दोन वार गंभीर होते. त्याच्या जखमा खोलवर होत्या. डॉ. नितिन डांगे यांनी सैफवर उपचार केले. त्यांनी त्याच्या तब्येतीची ताजी अपडेट दिली. त्यानुसार, “सैफ अली खान आता पूर्णपणे सुरक्षित आहे. हल्ल्यात त्याला चार गंभीर जखमा तर दोन किरकोळ जखमा झाल्या. एका चाकूचा 2.5 इंचाचा तुकडा त्याच्या पाठीत फसला होता. हा चाकूचा तुकडा त्याच्या पाठीत खोलवर गेला असता तर त्याला लकवा मारला असता. पक्षाघात होण्याची भीती होती. पण दैवबलवत्तर म्हणून सैफला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला नाही.”
सैफला दोन-तीन दिवसात सुट्टी
डॉक्टरानुसार, सैफ अली खान याला दोन ते तीन दिवसांत सुट्टी देण्यात येईल. आता त्याची फिजोओथेरपी सुरू करण्यात आली आहे. तो लवकरच बरा होईल अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली. एका आठवड्यानंतर सैफ अली खान त्याचे शुटिंग सुरू करू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हल्ल्यानंतर सैफ अली खान याला तातडीने लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
तर करिअर आणि आयुष्य संपले असते क्षणात
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर चाकूचा घाव अधिक खोलवर गेला असता तर सैफ अली खान याला पक्षघात झाला असता. म्हणजे त्याच्या शरीराचा एखादा भाग काम करू शकला नसता. त्यामुळे त्याचे करिअर आणि आयुष्य पणाला लागले असते. दरम्यान अजून ही आरोपीला अटक न झाल्याने फॅन्स संतापले आहेत.