AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी… ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना फाशी दिल्याचा उल्लेख करत धमकी देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी... ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख
Taj And airportImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 17, 2025 | 11:46 AM
Share

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल.

मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. असे सांगितले जात आहे की ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना “अन्यायाने फाशी दिल्याचा” उल्लेख करत ही धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. वाचा: कितीही मोठं संकट येऊ द्या, अख्खं जग का बुडेना… शेजारच्या ‘या’ देशाला काहीच पडलं नाही

सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्क्वॉडच्या पथकाने प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

लष्कराने दहशतवाद्यांचा बदला घेतला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेतली जात आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. मृतांमध्ये अनेकजण महाराष्ट्रातील होते. भारताने या हल्ल्याचा बदला पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून घेतला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले होते.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.