AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही मोठं संकट येऊ द्या, अख्खं जग का बुडेना… शेजारच्या ‘या’ देशाला काहीच पडलं नाही

भारत-पाकिस्तानमधील तणाव असो वा चीन-तैवानमधील वाद… एक देश कायम मौन धारण करतो. या देशाने कोणालाही मित्र किंवा शत्रू बनवलेले नाही.

कितीही मोठं संकट येऊ द्या, अख्खं जग का बुडेना... शेजारच्या 'या' देशाला काहीच पडलं नाही
India Neighbor CountryImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 16, 2025 | 2:26 PM
Share

जगाच्या कोणत्याही भागात संकट आले किंवा त्यामुळे स्वतःचे नुकसान झाले तरीही एक देश असा आहे जो कायमच मौन बाळगते. भारत-पाकिस्तान वादावरही या सरकारने मौन धारण केले आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, भारताच्या शेजारील देश असा का वागतो? चला जाणून घेऊया या देशाविषयी…

भारत-पाकिस्तानमधील तणाव असो वा चीन-तैवानमधील वाद… हा आशियाई देश नेहमीच गप्प राहतो. या देशाचे नाव आहे ‘थायलंड.’ थायलंड भारताशी समुद्री सीमा सामायिक करतो, तरीही भारत-पाकिस्तान वादावर थायलंडने कोणतीही टिप्पणी केलेली नाही. थायलंड हा पर्यटनासाठी प्रसिद्ध देश मानला जाते. येथे बौद्ध समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, जे शांत स्वभावाचे मानले जातात. असे म्हणतात की, यामुळेच थायलंडचे लोक कोणत्याही वादात पडत नाहीत. वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

भारत-पाक वादावर थायलंडचे मौन

भारत आणि पाकिस्तानमधील वादावर थायलंड पूर्णपणे गप्प राहिला आहे. थायलंडचे पंतप्रधान पी. शिनवात्रा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, पण हल्ल्याबाबत मौन बाळगले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी बांगलादेश आणि अफगाणिस्तानसारख्या देशांनीही निवेदने दिली, पण थायलंडने या संपूर्ण प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, थायलंडने प्रथमच कोणत्याही देशांमधील तणावावर टिप्पणी केली नाही असे नाही. थायलंड हा देश अनेक मोठ्या मुद्द्यांवर गप्प राहिला आहे. यामध्ये चीन-जपानमधील तणाव आणि चीन-तैवानमधील तणाव यांचाही समावेश आहे.

थायलंड असे का करतो?

‘द डिप्लोमॅट’ने थायलंडच्या मौन परराष्ट्र धोरणावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, थायलंडने आपल्या शांततेच्या आधारावर परराष्ट्र धोरण तयार केले आहे. थायलंडला कोणीही खास मित्र किंवा शत्रू बनवायचे नाही. यामागील प्रमुख कारण आहे थायलंडचे पर्यटन धोरण. थायलंडला माहित आहे की, जर त्यांनी एखाद्या देशाला मित्र बनवले तर दुसरा देश त्यांचा शत्रू होईल. अशा परिस्थितीत त्यांच्या पर्यटन व्यवसायाला नुकसान पोहोचेल.

थायलंडचा पर्यटन व्यवसाय सुमारे 61,322 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा आहे. थायलंडला बहुतांश महसूल यातूनच मिळतो. जर थायलंडचा पर्यटन व्यवसाय बिघडला तर देशाची आर्थिक स्थिती डळमळू शकते. त्यामुळे थायलंड कोणत्याही देशाशी वैर घेत नाही. तो प्रत्येक मुद्द्यावर गप्पच राहतो, मग तो मोठा असो वा छोटा.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.