शिवसेना नेते संजय राऊतांना मोठा दिलासा; ‘ती’ याचिका कोर्टाने फेटाळली

| Updated on: Aug 25, 2021 | 11:59 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (sanjay raut)

शिवसेना नेते संजय राऊतांना मोठा दिलासा; ती याचिका कोर्टाने फेटाळली
Sanjay Raut
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राऊत यांनी अज्ञात इसमाद्वारे छळ केल्याचा आरोप सदर याचिकेत करण्यात आला होता. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (bombay high court relief shiv sena leader sanjay raut)

काय आहे प्रकरण?

एका महिलेने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला होता. एका व्यक्तिच्या माध्यमातून राऊत यांनी आपला छळ केल्याचं या महिलेने म्हटलं होतं. राऊत यांनी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसं ठेवली होती. हेरगिरी करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं आणि जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं आदी आरोप या महिलेने राऊत यांच्यावर केले होते. 2013 पासून आपला छळ सुरू असल्याचा दावा या महिलेने याचिकेत केला होता. या महिलेने याबाबत पोलिसात एक तक्रारही दिली होती. तक्रार देऊनही पोलिसांनी एफआयआर नोंदवला नसल्याचं या महिलेने म्हटलं होतं. तसेच या प्रकरणात पोलिसांनाही प्रतिवादी करण्यात आलं होतं. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजकारण रंगले

दरम्यान, राऊत यांच्यावर या महिलेने आरोप केल्यानंतर त्यावर राजकारण रंगले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावरून राऊतांना सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आजही त्यांनी मीडियाशी बोलताना राऊतांवर टीका केली. त्यावेळी, राऊत तुमच्यावर एका महिलेने आरोप केले, तिला जेलमध्ये जायला भाग पाडलं. किती हा सत्तेचा दुरुपयोग, अशी टीका पाटील यांनी केली होती. दरम्यान, कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राऊत यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (bombay high court relief shiv sena leader sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

वकिलांची टीम राणेंच्या घरी, सर्व खटले रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार

शाब्बास पठ्ठ्यांनो! राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

Narayan Rane : जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी

(bombay high court relief shiv sena leader sanjay raut)