नैराश्यातून 20 वर्षीय तरुणाची कीटकनाशक पिऊन वाशीच्या खाडीत उडी; मच्छिमाराच्या मदतीने वाचवण्यात यश

| Updated on: Oct 13, 2020 | 6:43 PM

अभ्यासात लक्ष लागत नसल्यामुळे 20 वर्षाच्या मुलाने नैराश्याच्या भरात कीटकनाशकाचे प्राशन करुन वाशी खाडीमध्ये उडी घेतली.

नैराश्यातून 20 वर्षीय तरुणाची कीटकनाशक पिऊन वाशीच्या खाडीत उडी; मच्छिमाराच्या मदतीने वाचवण्यात यश
Follow us on

नवी मुंबई : अभ्यासात लक्ष लागत नसल्यामुळे 20 वर्षाच्या मुलाने (Commit Suicide Vashi Khadi) नैराश्याच्या भरात कीटकनाशकाचे प्राशन करुन वाशी खाडीमध्ये उडी घेतली. ही घटना 12 ऑक्टोबरच्या रात्री 9:30 वाजता घडली आहे. वाशी खाडी पुलावरुन माहिती बिट मार्शल यांना मिळताच तात्काळ स्थानिक मच्छीमार बाळकृष्ण भगत यांच्या मदतीने सदर मुलाला खाडीच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढले (Commit Suicide Vashi Khadi).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग धनंजय ठाकूर मुंबईत चेंबूर भागात राहत आहे. तो सध्या इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. पण, त्याचे अभ्यासात लक्ष लागत नसल्याने त्या नैराश्याच्या भरात त्याने कीटकनाशकाचे प्राशन करुन खाडीमध्ये उडी मारली.

या मुलाच्या आरोग्याला कीटकनाशकांमुळे काही धोका होऊ नये याकरिता त्याला तात्काळ उपचारासाठी नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या मुलाच्या वडिलांना संपर्क साधून ही माहिती दिली असता त्याचे वडिलांनी त्यांचे एकुलता एक मुलाला वाचविल्याबद्दल वाशी पोलिसांचे आभार मानले. सदर मुलाची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे.

Commit Suicide Vashi Khadi

संबंधित बातम्या :

ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या