AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! टेरेसवर कॉफी पित असताना अंगावर वीज पडली, मुंबईत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

गुरुवारी संध्याकाळीही मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धक्कादायक! टेरेसवर कॉफी पित असताना अंगावर वीज पडली, मुंबईत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 23, 2020 | 7:49 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये सेक्टर 12 जी या ठिकाणी वीज अंगावर पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळीही मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (boy died on the spot after getting electrocuted navi mumbai news)

मिळालेल्या माहितीनुसार, सागर विश्वकर्मा असं तरुणाचं नाव असून तो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होता. संध्याकाळी तो निसर्गाचा आनंद घेत कॉफी पीत टेरेसवर बसलेला होता. त्यावेळी वीजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी ऐवढ्या जोरात वीजांचा कडकडाट होता की टेरेसवर वीज पडून फ्लोअरला तडा गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

तरुण वयातच मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. खरंतर, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पाणी शिरलं तर कोणाच्या घरांमध्ये पाणी भरलं. पावसाच्या पाण्यात काही जण वाहून गेल्याच्याही घटना समोर आल्या.

दरम्यान, एकीकडे राज्यात कोरोनाचा जीवघेणा संसर्ग डोकं वर काढून आहे तर दुसरीकडे अस्मानी संकटही आहे. त्यामुळे प्रत्येकानं हवामानाच्या बदलांनुसार काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अगदी अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडा. नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मुसळधार पाऊस सुरू झाला असता आहे त्या ठिकाणी थांबून पाऊस थांबण्याची वाट बघा, हे महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या – 

‘…हा आचारसंहितेचा भंग आहे’, बिहार निवडणुकांवरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

Eknath Khadse | एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत, शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

(boy died on the spot after getting electrocuted navi mumbai news)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.