Eknath Khadse Live Update | माझ्या मागे ED लावली तर मी CD लावेन : एकनाथ खडसे

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे.(Eknath Khadse Join NCP In Mumbai Live Update)

Eknath Khadse Live Update | माझ्या मागे ED लावली तर मी CD लावेन : एकनाथ खडसे


मुंबई :  भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी तब्बल 40 वर्षे भाजपमध्ये राहून आपली राजकीय कारकीर्द गाजवल्यानंतर, त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला. प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित नाहीत. “कार्यकर्त्यांची भावना होती, म्हणून मी राष्ट्रवादीत आलो. नाथाभाऊची ताकद काय आहे, हे जळगावात या दाखवून देतो.  40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही. भाजप ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू”, असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.  राष्ट्रवादीत प्रवेश करुन डोक्यावरचं वजन कमी उतरलं, हलकं हलकं वाटत आहे, असं खडसे म्हणाले.   (Eknath Khadse Join NCP In Mumbai Live Update)

 एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

LIVE UPDATE

[svt-event title=” नाथाभाऊंच्या प्रवेशामुळे खान्देश राष्ट्रवादीमय होईल: शरद पवार” date=”23/10/2020,4:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे यांचं संपूर्ण भाषण” date=”23/10/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”तर मी सीडी लावेन – खडसे” date=”23/10/2020,4:10PM” class=”svt-cd-green” ] त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन यावरुन करते [/svt-event]

[svt-event title=” 40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही” date=”23/10/2020,4:10PM” class=”svt-cd-green” ] संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपला 6 खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने 5 जागा जिंकून आणल्या. 40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही – एकनाथ खडसे [/svt-event]

[svt-event title=” संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला – एकनाथ खडसे ” date=”23/10/2020,4:09PM” class=”svt-cd-green” ] ४० वर्षे पक्षात राहिल्याने पक्ष सोडावा असं कधी वाटलं नाही. माझी छळवणूक झाली सर्वांनी पाहिली. मी वारंवार त्याबाबत विचारत होतो. सभागृहात सांगा, कागदपत्रं द्या, बऱ्याच वेळा विचारलं पण त्याचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही.मी खूप संघर्ष केला. भाजपमध्ये आणि मंत्रिमंडळातही संघर्ष केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला [/svt-event]

[svt-event title=”जयंत पाटील यांचं भाषण” date=”23/10/2020,4:05PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश” date=”23/10/2020,4:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पवारांकडून महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो – जयंत पाटील ” date=”23/10/2020,3:59PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं. [/svt-event]

[svt-event title=”पिक्चर अभी बाकी है – जयंत पाटील ” date=”23/10/2020,3:59PM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो हे दाखवून दिलं. त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून ताकदही आम्ही पाहिली. खडसेंचा एक दिग्गज नेता मंत्री झाला, मात्र पहिल्या रांगेतील नेत्याला सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचं काम भाजपमध्ये झालं. खडसेंवरील अन्यायावर सभागृहात सर्वात जास्त मीच बोललो. कटप्पाने बाहुबली को क्यु मारा असा प्रश्न मी विचारला, पण त्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही. आजही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळालं असेल की टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है हे आता त्यांना कळेल. [/svt-event]

[svt-event title=”टायगर अभी जिंदा है : जयंत पाटील ” date=”23/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थानं रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहात प्रश्न विचारला होता, कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है [/svt-event]

[svt-event title=”जयंत पाटील यांच्याकडून शरद पवारांची दिलगिरी” date=”23/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांनी आधीच सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे आत केवळ 50 खुर्च्याच ठेवल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्याबद्दल मी शरद पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार NCP कार्यालयात दाखल” date=”23/10/2020,3:30PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार NCP कार्यालयात दाखल, थोड्याच वेळात खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश [/svt-event]

[svt-event title=”जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांची बैठक संपली” date=”23/10/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात अर्ध्या तासापासून चर्चा” date=”23/10/2020,3:06PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बऱ्याच वेळापासून चर्चा सुरू, अर्ध्या तासापासून दोघांमध्ये चर्चा, ही चर्चा लांबण्याची शक्यता, जितेंद्र आव्हाड यांची पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती, खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार उशिरा पोहोचण्याची शक्यता, जयंत पाटील यांनी वाय बी चव्हाण इथे फोन केल्याची सूत्रांची माहिती, पक्ष कार्यालयातून फोन आल्याशिवाय निघू नका, अशी माहिती समोर [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश लाईव्ह” date=”23/10/2020,2:38PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”खडसेंसह 72 जणांचे राष्ट्रवादीत प्रवेश” date=”23/10/2020,2:36PM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसेंसह 72 जणांचे राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटील यांची घोषणा [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे काही वेळातच वाय.बी. चव्हाण सेंटरकडे जाण्यासाठी निघणार” date=”23/10/2020,2:34PM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसे काही वेळातच वाय.बी. चव्हाण सेंटरकडे जाण्यासाठी निघणार, खडसेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी [/svt-event]

[svt-event title=”खडसेंनी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही : जयंत पाटील” date=”23/10/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला 11 दिग्गजांची उपस्थिती” date=”23/10/2020,1:57PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे प्रवेश करत असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीत स्वागत : नवाब मलिक” date=”23/10/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”…म्हणून नाथाभाऊंचं मुख्यमंत्रिपद गेलं; रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट” date=”23/10/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पद सोडण्यास तयार, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य – दादा भुसे ” date=”23/10/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ] कृषिमंत्र्यांकडून निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या पारड्यात, पद सोडण्यासाठी तयार, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, कृषिमंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे यांना नेमकं कोणतं पद?” date=”23/10/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] खडसेंना नियोजन मंडळाचं उपाध्यक्षपद देण्याच्या हालचाली, कॅबिनेट दर्जासाठी आटापिटा, शिवसेना कृषी खाते सोडण्यास तयार नसल्याची चर्चा, जितेंद्र आव्हाड गृहनिर्माणसाठी अडून बसल्याची चर्चा [/svt-event]

दोन दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा

गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले.

“काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला,” असं खडसे म्हणाले.

मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.

सून रक्षा खडसे भाजपमध्येच, तर कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीत

एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यासोबतच भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ खडसे यांना कृषी, जलसंपदा किंवा गृहनिर्माण?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द

1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला. (Eknath Khadse Join NCP In Mumbai Live Update)

संबंधित बातम्या : 

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

…तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेन, भाजप राजीनाम्यानंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI