Chief Justice: सिंधुदुर्गचे सुपुत्र उदय लळीत होणार देशाचे 49 वे सरन्यायाधीश, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात होते सरकारी वकील

हायप्रोफाईल केसमध्ये सहभाग विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली असूनही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत.

Chief Justice: सिंधुदुर्गचे सुपुत्र उदय लळीत होणार देशाचे 49 वे सरन्यायाधीश, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात होते सरकारी वकील
भारताचे नवे सरन्यायाधीश
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Jul 29, 2022 | 8:23 AM

मुंबई, सिंधुदुर्गचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत (Uday Lalit) हे देशाचे 49 वे सरन्यायाधीश (Chief Justice) म्हणून येत्या 27 ऑगस्टला पदभार स्वीकारणार आहेत. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. हायप्रोफाईल केसमध्ये सहभाग विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली असूनही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. 80 हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम(2 G spectrum) हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.

न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्‍याचे सुपुत्र असून गिर्ये ‘कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबीय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, ‘हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले.

वकिलीचा पिढीजात वारसा

लळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.

हे सुद्धा वाचा


येत्या 27 ऑगस्ट रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. दरम्यान, ही बातमी कोकणवासियांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची आहे. येथील गिर्ये-कोठारवाडीत न्यायाधिश लळीत यांचे मूळ घर आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर देवगड तालुक्याच्या सुपुत्राची निवड होत असल्याने सिंधुदुर्गवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें